Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचं धुमशान, भल्या पहाटे राधानगरी धरणाचे उघडले दरवाजे

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 10, 2022 | 08:41 IST

Kolhapur Heavy Rain: कोल्हापुरात (Kolhapur) जिल्ह्यातही पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय.

 kolhapur weather today
कोल्हापूर पाऊस 
थोडं पण कामाचं
  • गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे.
  • या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे.
  • कोल्हापुरातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे.

कोल्हापूर: Kolhapur Rain Update: गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain)  धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. अशातच कोल्हापुरात (Kolhapur) जिल्ह्यातही पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. तर कोल्हापुरातील राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. 

कोल्हापुरातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसानं धुमशान घातलं आहे. या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्यानं वाढ होत आहे. या पावसामुळे धरण 100 टक्के भरले आहे. धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा उघडला आहे. पहाटे साडेपाच वाजता हा दरवाजा उघडण्यात आला. एका दरवाज्यातून प्रतीसेकंद 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.  पावर हाऊस मधून 1600 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.

अधिक वाचा-  Breaking News 10 August 2022 Latest Update: कोकणसह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

राधानगरी धरणातून एकूण 3028 क्युसेक विसर्ग पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. नदी आता धोका पातळीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. भोगावती नदीकडच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान  राधानगरी धरण 100 टक्के भरल्याने कोल्हापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली.

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची परिस्थिती आहे. मंगळवारी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. दरम्यान आज पहाटे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. 

पात्राबाहेर आलं पाणी 

जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीनं मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास  इशारा पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी 6 वाजता 39 फूट 8 इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा नदीनं सध्या धोका पातळीच्या दिशेनं वाटचाल केली आहे. तर  जिल्ह्यातील 71 बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहेत. 

पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली असल्यानं यंत्रणाही सतर्क झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनानं नागरिकांना केलं आहे. तसंच आंबेवाडी आणि चिखली गावातील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. दरवर्षी या दोन गावांना महापुराचा सर्वात जास्त फटका बसतो. याच पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्यात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी