मुंबईत पावसाचं तांडव..! लाईफलाइन विस्कळीत, लोकल ट्रेनचं Current Status

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 07, 2022 | 11:47 IST

Mumbai Local Train Status: लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Mumbai local train
मुंबई लोकलची सद्यस्थिती 
थोडं पण कामाचं
  • मुंबईत कालपासून धो-धो पाऊस कोसळत आहे.
  • पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
  • आता या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसल्याचं दिसतंय.

मुंबई: मुंबईत कालपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. मुंबईत पुढच्या पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे.  पहाटेपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.  अजूनही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र आता या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसल्याचं दिसतंय. मुंबई लोकलचं वेळापत्रक आता कोलमडलं आहे. मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेन आता उशिरानं धावत आहेत. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झाल्यानं चाकरमान्यांना कामावर जाताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतेय. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे. हार्बर मार्गावरही सारखीच परिस्थिती आहे. हार्बर मार्गावरील ट्रेन 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. त्यामुळे पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील ट्रेन सध्या सुरू आहेत मात्र अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे. 

मुंबई लोकलचे अपडेट्स

  • पश्चिम रेल्वे- 10 ते 15 मिनिटं उशिरा
  • मध्य रेल्वे- 20 ते 25 मिनिटं उशिरा
  • हार्बर रेल्वे- 25 मिनिटं उशिरा

अधिक वाचा-  मंत्री झाले तेव्हा भुमरेंनी सामना कार्यालयात माझ्यासमोर लोटांगण घातलेलं: राऊत

मुंबईतल्या पावसाची स्थिती 

मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आला आहे.  आज पहाटे साडेपाच पर्यंत कुलाबा वेधशाळेत 95.4 मिमी तर सांताक्रुझमध्ये 96.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज आणि उद्या मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही येत्या 3-4 तास जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी