Heavy Rainfall Alert : पुढील पाच दिवसात वादळाची शक्यता, या भागात पडणार पाऊस

Weather Alert: दिल्ली एनसीआरसह देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विविध भागात हलक्या तीव्रतेसह पाऊस पडेल.

Heavy Rainfall Alert: Chance of storm in next five days, It will rain in this area
Heavy Rainfall Alert : पुढील पाच दिवसात वादळाची शक्यता, या भागात पडणार पाऊस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • देशातील अनेक भागात वादळाचा इशारा
  • पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबई : देशातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, पुढील पाच दिवस झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Heavy Rainfall Alert: Chance of storm in next five days, It will rain in this area)

अधिक वाचा : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा 

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हरियाणा आणि बांगलादेश दरम्यान पूर्व ते पश्चिम कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. दिल्लीत आठवडाभर उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. देशात पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ वर्तवत आहेत.


न्यूज एजन्सी IANS च्या रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, केंद्रशासित प्रदेशातील अनेक भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

अधिक वाचा : Suicide अंतर्गत वादातून जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर गोळी झाडून केली आत्महत्या

स्कायमेट वेदर या खाजगी एजन्सीने हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, त्यानुसार नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. दुसरीकडे, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशातील बहुतांश भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 106% असण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये ते 99 टक्के अपेक्षित होते. ईशान्य भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : CCTV : चालत्या ट्रेनमध्ये चढताना महिला पडली, आरपीएफ जवानाने वाचवले जीव, घटना सीसीटीव्हीत कैद

स्कायमेट हवामान अहवालानुसार, पुढील २४ तासांत नागालँड, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, केरळ, लक्षद्वीप, दक्षिण किनारी कर्नाटक आणि सिक्कीमच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा, कोकण, गोवा, मराठवाडा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, तामिळनाडूचा काही भाग, आंध्र प्रदेशच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी