सुसाट वेगाने केला घात, मेटेंच्या कार अपघाताचे एक कारण समजले

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सुरू असलेल्या या चौकशीत अपघाताचे एक कारण समजले आहे. 

high-speed one of the reason behind vinayak mete car accident
सुसाट वेगाने केला घात 
थोडं पण कामाचं
  • सुसाट वेगाने केला घात
  • मेटेंच्या कार अपघाताचे एक कारण समजले
  • मेटेंच्या कारने एका मिनिटात साधारण १.१०४१ किमी एवढ्या वेगाने प्रवास केला

पनवेल : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सुरू असलेल्या या चौकशीत अपघाताचे एक कारण समजले आहे.  ( high-speed one of the reason behind vinayak mete car accident )

विनायक मेटे बीड जिल्ह्यातून मुंबईत महत्त्वाच्या बैठकीसाठी येत होते. कोणत्याही परिस्थितीत सकाळी लवकर मुंबईत पोहोचावे या उद्देशाने मेटेंच्या कारच्या चालकाने वेग वाढवला. या वाढवलेल्या वेगाने प्रवास झटपट झाला. पण मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रसायनी पोलिसांच्या हद्दीत असताना चालकाचे नियंत्रण सुटले असावे अथवा डोळ्यांवर झोप आल्यामुळे चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले असावे असा संशय व्यक्त होत आहे. 

बीड जिल्हा ते खालापूर टोलप्लाझा हे अंतर ३१७ किमी आहे. हे अंतर मेटे यांच्या कारने २८७ मिनिटांत म्हणजेच ४ तास ४७ मिनिटांत पूर्ण केले. नंतर टोलप्लाझा ते अपघातस्थळापर्यंतचे १८ किमी अंतर हे नऊ मिनिटांत पार केले होते. हा सगळा प्रवास सुरू असताना मेटेंचा एकच चालक कार्यरत होता. चालक सुसाट वेगाने कार चालवत होता. लांबच्या प्रवासाची सवय असल्यामुळे चालक कदम हे कार व्यवस्थित हाताळत होते. पण रसायनी येथून जात असताना त्यांचे नियंत्रण सुटले असण्याचा संशय व्यक्त होत आहे.

कारचा अपघात ज्या पद्धतीने झाला त्यावरून सुसाट वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अथवा सुसाट वेगाने जात असलेल्या कारच्या चालकाच्या डोळ्यांवर झोप आल्यामुळे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

मेटे मागच्या सीटवर झोपले होते आणि त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. चालक कदम जखमी झाला तर त्याच्या शेजारी असलेला मेटेंचा अंगरक्षक राम ढोबळे गंभीर जखमी झाला. 

पावसामुळे औरंगाबाद ते पुणे तसेच मुंबई ते पुणे मार्गावर काही ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरून जाताना मेटेंच्या कारने एका मिनिटात साधारण १.१०४१ किमी एवढ्या वेगाने प्रवास केला. याच कारणामुळे आतापर्यंत झालेल्या चौकशीतून सुसाट वेग आणि वेगात असताना सुटलेले कारवरील नियंत्रण यातून अपघात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी