hsc exam maths paper leak case, SIT will conduct a thorough investigation in the 12th paper leak case : बारावीचा गणित या विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी विशेष तपास पथकामार्फत (Special Investigation Team : SIT) तपास केला जाणार आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी पकडलेल्या दोन आरोपी शिक्षकांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बारावीचा पेपर पुन्हा होणार नाही, असे बोर्डामार्फत याआधीच सांगण्यात आले आहे. आता या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याने येणाऱ्या काही दिवसांत फेरपरीक्षेचा निर्णय बोर्डाद्वारे घेतला जातो का? याकडे अनेकांचे लक्ष आहे.
जे आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतले आहेत त्यामध्ये काही खासगी शिक्षण संस्थांचे शिक्षक आहेत. तसेच खासगी शिक्षण संस्थांच्या संपर्कात असलेले काही नागरिक आहेत. एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून पेपर फोडण्याचा उद्योग करण्यात आला. या सगळ्याचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
अमरावती विभागाच्या सचिवांनी पत्रक काढून महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 6060 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकाला तसेच संबंधित केंद्रातील सर्व शिक्षकांना बदलावे असा आदेश दिला आहे. परीक्षा केंद्रावर तिथे परीक्षा देणार असलेले विद्यार्थी आणि संबंधित केंद्रावरचे शिक्षक वगळता इतरांना प्रवेश करण्यास आणि थांबण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
HSC Board Exam 2023 : बोर्डाचा घोळ सुरूच; इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत चूक
मुंबई महापालिकेत 12वी पाससाठी मोठ्या भरतीची घोषणा; पगार असेल लाखाच्या घरात
एसआयटीचे पथक मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करेल. या पथकात साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल निवृत्ती पोफळे, सुरजसिंग राजपूत, प्रदीप सोभागे यासह मेहकर, लोणार, बिबी, सिंदखेडराजा येथील पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जाईल. तसेच ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा पेपर फोडण्यासाठी वापर झाला त्या ग्रुपमधील प्रत्येकाची चौकशी होणार आहे. या प्रकरणात सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.