Success password by Sharad Pawar : राजकारणात यशस्वी व्हायचं तर हे करा, शरद पवारांनी सांगितलेला 'तो' किस्सा सर्वांच्या राहील कायम स्मरणात

Success password by Sharad Pawar 'नेमकचि बोलणे' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या भाषणाच्या काही भागाचे वाचन करण्यात आले. त्यावेळी अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी पवार यांच्याबद्दलचा नावे लक्षात ठेवण्याचा एक किस्सा सांगितला. तो सर्वांच्या कायम स्मरणात राहील असा आहे.

Success password by Sharad Pawar  : राजकारणात यशस्वी व्हायचं तर हे करा, शरद पवारांनी सांगितलेला 'तो' किस्सा सर्वांच्या राहील कायम स्मरणात
If you want to succeed in politics, do this, the 'he' case told by Sharad Pawar will always be remembered by all  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'नेमकचि बोलणे' या शरद पवार याच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन
  • त्यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याबाबतचा एक किस्सा सांगितला.
  • राजकारणात फार कमी कष्टाने आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळते.

Success password by Sharad Pawar मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज राज्यभर ८१ वा वाढदिवस (sharad pawar birthday) साजरा होत आहे. लेखक सुधीर भोंगळे यांनी लिहिलेल्या 'नेमकचि बोलणे' या शरद पवार याच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला पवार उपस्थित होते. त्यावेळी अभिनेता आणि कवी किशोर कदम  (kishor kadam) यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी कार्यकर्त्यांची नावे लक्षात ठेवण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. (If you want to succeed in politics, do this, the 'he' case told by Sharad Pawar will always be remembered by all)
 

तुम्ही कार्यकर्त्यांची इतकी नावे कशी काय लक्षात ठेवता

ज्येष्ठे नेते खासदार शरद पवार यांच्या गाजलेल्या भाषणांचा संग्रह 'नेमकचि बोलणे'  या पुस्तकात करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार यांच्या भाषणाच्या काही भागाचे वाचन करण्यात आले. त्यावेळी अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी पवार यांच्याबद्दलचा नावे लक्षात ठेवण्याचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी कदम यांनी पवार यांनी प्रश्न विचारला की, आम्ही नट असून पाठांतरात कमी आहोत आणि तुम्ही कार्यकर्त्यांची इतकी नावे कशी काय लक्षात ठेवता?

काम होवो न होवो, साहेबांनी मला नाव घेतल्याचे समाधान 

कदम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवारसाहेब यांनी एक किस्सा सांगितला. राजकारणात फार कमी कष्टाने आणि कमी भांडवलात तुम्हाला यश मिळते. फक्त तुम्ही समोरच्या माणसाचे नाव लक्षात ठेवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मतदारसंघातली एक महिला मला भेटायला आली. तिचे काहीतरी काम होते. मी तिला म्हटले, की काय गं कुसुम, मुंबईला कशी, काय चाललंय?. यावर साहेबांनी मला नाव घेऊन हाक मारली. काम होवो न होवो, अशी तिची भावना होती, असा किस्साच शरद पवार यांनी उपस्थितांना ऐकवला.

अशा गुणांमुळे समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त होते.

पवार म्हणाले की, लोकांचे खूप छोट्या गोष्टीत सुख असते. म्हणूनच या गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशा दोन व्यक्ती महाराष्ट्रातल्या राजकारणात होत्या. पहिले म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि दुसरे वसंतदादा पाटील. हे दोघे त्यांना कितीही जुना माणूस भेटला तरी ते त्यांचे नाव लक्षात ठेवायचे. अशा गुणांमुळे समाजामध्ये कायमस्वरुपी स्थान प्राप्त होते. यश मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी