IMD Alert: मुसळधार पाऊस आणि गारपीट... , येत्या दोन दिवसात कुठे कुठे पडणार पाऊस

Maharashtra Weather Updates : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन मध्यम पाऊस पडू शकतो. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

IMD Alert: Heavy rain with thunderstorms in the state, where will it rain in the next two days
IMD Alert: मुसळधार पाऊस आणि गारपीट... , येत्या दोन दिवसात कुठे कुठे पडणार पाऊस   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस
  • पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
  • मुंबईत मात्र उष्मा वाढला

मुंबई : राज्यभरात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. कुठे पाऊस पडतोय, कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.  मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात 3 ते 4 दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (IMD Alert: Heavy rain with thunderstorms in the state, where will it rain in the next two days)

अधिक वाचा : कांदा अनुदान पात्रतेसाठी ई-पीक पेरा नोंदीची अट शिथिल करा - धनंजय मुंडेंची मागणी

मुंबईच्या हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. IMD नुसार, आज पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, सांगली, सोलापूर आणि रत्नागिरी येथे जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, वाशीम यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांमध्ये गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आॅरेंज अलर्ट देण्यात येणार आहे. 

अधिक वाचा : Mumbai Goa Highway वर अपघात, मुंबईच्या कुटुंबातील 2 चिमुरड्यांसह तिघांचा मृत्यू

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

दुसरीकडे गेल्या २४ तासांच्या हवामानाबाबत बोलायचे झाले तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, तेलंगणा, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम मध्य आणि पूर्व भारतात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊ शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये प्रचंड उष्णतेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. येत्या ५ दिवसांत देशाच्या कोणत्याही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी