भंडाऱ्यात राष्ट्रवादीने राजकीय कुरघोड्या करत भाजपला साथ, काॅंग्रेसला दाखवला हात

भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सभापती व उपसभापती निवडीत काॅंग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेऊन पंचायत समित्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.

In Bhandara, the NCP supported the BJP by playing political tricks and showed its hand to the Congress
भंडाऱ्यात राष्ट्रवादीने राजकीय कुरघोड्या करत भाजपला साथ, काॅंग्रेसला दाखवला हात ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना धक्का
  • भंडारा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा सभापती
  • राष्ट्रवादीने भाजपशी केली युती

मुंबई :  राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्यात सत्तेत असलेल्या महविकास आघाडीची नेते भाजपला रोखण्यासाठी आगामी निवडणूक एकत्र लढू असे सांगत आहेत. पण भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत शुक्रवारी राष्ट्रवादीने राजकीय कुरघोड्या करत भाजपला साथ देऊन काॅंग्रेसला हात दाखवला आहे. (In Bhandara, the NCP supported the BJP by playing political tricks and showed its hand to the Congress)

अधिक वाचा : 

ठाकरे बंधूंच्या चढाओढीत पवारांनी गाठली अयोध्या, पवार कुटुंबियांची तिर्थयात्रा

भंडारा जिल्ह्यात डिसेंबर २०२१ आणि जानेवारी महिन्यात पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आज शुक्रवारी सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक झाली. भंडारा पंचायत समितीत भाजप ७, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ४, अपक्ष २, शिवसेना १ असे संख्याबळ आहे. काॅंग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेतले आहे. सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस तर उपसभापती पद भाजपला देण्यात आले. 

अधिक वाचा : 

एका फ्रेममध्ये ठाकरे परिवाराच्या पाच पिढ्या

तसेच पवनी पंचायत काँग्रेसला सर्वाधिक जागा असताना राष्ट्रवादीने शिवसेना आणि भाजपलासोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. याठिकाणी सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपसभापतीपद शिवसेनेच्या वाट्याला आले आहे. तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपने काँग्रेससोबत मिळून सभापतीपद आपल्याकडे ठेवले असून उपसभापतीपद काँग्रेसला दिले आहे. लाखांदूरात राष्ट्रवादीचे फक्त दोनच सदस्य असताना ५ सदस्य असलेल्या काँग्रेसला बाजूला सारत राष्ट्रवादीने भाजपचा पाठिंबा मिळविला. याठिकाणी सभापती आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीने आपलेकडे ठेवले. 

अधिक वाचा : 

NAVI MUMBAI | 20 तोळे सोने पॉलिशसाठी दिले, कारागीर झाला पसार,  दोन वर्षांनंतर आला ताब्यात 

मोहाडीत भाजपला स्पष्ट बहुमत असले, तरी अनुसूचित जाती राखीव प्रवर्गातील उमेदवारच नव्हते. परिणामी राष्ट्रवादीकडे सभापतीपद आले. तर उपसभापतीपद भाजपने प्राप्त केले. लाखनीत काँग्रेसच्या वाट्याला सभापतीपद तर भाजपला उपसभापतीपद मिळाले. साकोलीमध्ये बहुमत असलेल्या काँग्रेसला एकतर्फी सत्ता प्राप्त करता आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी