पहिल्याच पावसात लोकलमुळे मुंबईकरांची तारांबळ, संगमनेरमध्ये घर कोसळल्याने तिघांचा मृत्यू

Mumbai Rains Update:मुंबईसह मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणचा काही भागातही पावसाने हजेरी लावली. मुंबई शहरात रात्री उशिरा हलका पाऊस झाला. पुण्यात आज सकाळ ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली. दरम्यान, हिंगोलीतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे.

In the first rain, Mumbaikars' cable, overhead wire on Trans Harbor route was broken, local service was disrupted.
पहिल्याच पावसात मुंबईकरांची तारांबळ, ट्रान्स हार्बर मार्गावर ओव्हर हेड वायर तुटली, लोकल सेवा ठप्प   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या
  • लोकल सेवा खोलंडबल्याने मुंबईकरांचे हाल
  • अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घेतला तिघांचा जीव

मुंबई : गुरुवारी गुरुवारीपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. गुरुवारी दुपारपासून मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापमानात घट होऊन गर्मीपासून दिलासा मिळाला. दरम्यान, ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. तर मध्यरेल्वेच्या घाटकोपर स्थानकातही काही वेळेसाठी लोकल रकडल्याचे चित्र पहायला मिळाले. (In the first rain, Mumbaikars' cable, overhead wire on Trans Harbor route was broken, local service was disrupted.)

अहमदनगर जिल्ह्यातील आकलापूर येथे वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून एकाच घरातील तिघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन वृध्द व एका बालकाचा मृत्यू झाल्याने संगमनेर तालुक्यातील अकलापुर येथे दुधवडे परिवारावर काळाने घाला घातला आहे.

अधिक वाचा : 

Narayan Rane On Uddhav Thackeray : नारायण राणे यांनी काढली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लायकी? पुन्हा जीभ घसरली

मुंबईत गुरुवारी सायंकाळी पावसाने दणका दिला. तसेच ठाणे, नवीमुंबई परिसरात पावसाने हजेरी लावल्याने वातावरण आल्हाददायक झाले. मुंबई उपनगर मध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी संध्याकाळच्या वेळेस बरसल्या. त्यामुळे  हवेत काहीसा गारवा निर्माण झाला होता. मात्र अचानक पडलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची मात्र धावपळ झाली असली तरी हवेतल्या गारव्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत झाला होता. 

अधिक वाचा : 

SSC Result 2022: दहावीच्या बोर्डाच्या निकालबाबत आली आहे मोठी ताजी अपडेट 

ट्रान्स हार्बर मार्गावरील संध्याकाळी वाशी आणि सानपाडा स्टेशन दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने ठाणे ते वाशी मार्ग बंद आहे. मात्र ठाणे पनवेल, ठाणे नेरूळ, मार्ग सुरू आहे. पावसाला सुरूवात होताच दुकानदारानी देखील छत्री, रेनकोट  दुकानाबाहेर विक्रीसाठी काढल्या होत्या. तसेच पावसामध्ये फुटबॉल खेळून पहिल्या सरीचा आनंद देखील लुटताना नागरिक दिसून येत होते

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी