सभागृहात अजितदादांनी दम भरताच, मंत्री, विरोधी पक्षनेते अन् आमदारांनी पटापट घेतला मास्क

विधीमंडळ अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न वापरण्यावरून संताप व्यक्त केला.मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील त्यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली. त्यानंतर सदस्यांनी पटापट मास्क वापरण्यास सुरुवात केली.

In the House, Ajit Pawar breathed a sigh of relief, and the Minister, Leader of the Opposition and MLAs took off their masks
सभागृहात अजितदादांनी दम भरताचा, मंत्री, विरोधी पक्षनेते अन् आमदारांनी पटापट घेतला मास्क  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजित पवार यांनी सभागृहात मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून संताप व्यक्त केला.
  • मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणी केली
  • संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली.

मुंबई :  देशासह राज्यभरात कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव वाढला असून, त्यात आता आणखी ओमिक्राॅन (omicron) या नवीन वेरिएन्टमुळे तरी भिती वाढली आहे. सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचा वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून सुरु असलेल्या विधीमंडळ अधिवेशनातील (assembly session) अजित पवारांचं (ajit pawar) एक वक्तव्य समोर आलंय.  काही जणांचा अपवाद वगळता इतरांकडून मास्कचा (face mask) वापर करण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मास्क न वापरणाऱ्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढावे अशी मागणीदेखील त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर लगेच मंत्री, विरोधीपक्ष नेते आणि आमदारांनी पटापट मास्क वापरण्यासाठी घाई केली. (In the House, Ajit Pawar breathed a sigh of relief, and the Minister, Leader of the Opposition and MLAs took off their masks)

उपमुख्यमंत्र्यांचा तास

राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री आदित्य ठाकरे यांना धमकी, मुंबईच्या महिला महापौरांना अपशब्द काढल्याप्रकरणी आणि शेती विज बिलाच्या प्रश्नांवर विरोधकांकडून सरकारला घेरण्यात येत होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आसनावरुन उठले. त्यांनी थेट उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांच्याकडे बोलण्याची परवानगी मागितली. आणि त्यानंतर सभागृहातील सदस्यांचा तास घेण्यास सुरुवात केली.  

इथे कोणी मास्क लावत नाही,”

अजितदादा म्हणाले, "आपण तीन, चार, पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व दोन्ही बाजूचे सन्माननिय सदस्य करतायत. स्वत: देशाचे पंतप्रधान देखील जो काय सध्या करोनासंदर्भातील संकट आहे त्याबद्दल गांभीर्याने विचार करतायत. त्यामध्ये रात्री लॉकडाउन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर, देश पातळीवर सुरु आहे. काही ठराविक सोडले तर अजिबात इथे कोणी मास्क लावत नाही,” 

संपूर्ण महाराष्ट्र बघतोय

“संपूर्ण महाराष्ट्र इथं काय सुरु आहे ते बघतोय. आम्हीच कुणी मास्क लावत नसू तर कसं होणार? ठिक आहे, काही जणांना मास्क काढल्याशिवाय त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडता येत नसतील. पण बोलून झाल्यावर तरी मास्क घातला पाहिजे ना?,” असंही अजित पवार म्हणाले.

“अध्यक्ष मोहोदय काही काही गोष्टींचं गांभीर्य त्या त्यावेळीच लक्षात घेतलं पाहिजे. आपण देखील तिथं बसताना कोणीही मास्क घातलं नसेल तर त्याला बाहेर काढा. अगदी माझ्यासारख्याने मास्क घातलं नसेल तर मलाही बाहेर काढा. कुठंतरी हे गांभीर्याने घ्या. माझी विरोधी पक्षनेते आणि सर्वांनाच विनंती आहे की आपण हे गांभीर्याने घेतलं पाहिजे,” असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

अजित पवार यांनी मास्क न वापरण्याच्या मुद्यावरून व्यक्त केलेल्या संतापानंतर अनेक मंत्री, आमदार आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी मास्कचा वापर करण्यास सुरुवात केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी