ठाकरे बंधूंच्या चढाओढीत पवारांनी गाठली अयोध्या, पवार कुटुंबियांची तिर्थयात्रा

राज ठाकरेंनी त्या व्होटबँकेकडे डोळे लावले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाण्याच्या घोषणेनंतर आता शिवसेनेनेही अयोध्येला जाण्याची तयारी पूर्ण केली असताना आमदार रोहित पवार यांनी तिर्थयात्रा सुरु केली आहे.

ठाकरे बंधूंच्या चढाओढीत पवारांनी गाठली अयोध्या, पवार कुटुंबियांची तिर्थयात्रा
ठाकरे बंधूंच्या चढाओढीत पवारांनी गाठली अयोध्या, पवार कुटुंबियांची तिर्थयात्रा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे अयोध्येला जाण्याच्या घोषणेनंतर आता शिवसेनेचीही तयारी
  • रोहित पवारांच्या तिर्थयात्रेला सुरुवात
  • पवार कुटुंबिय पोहचले उत्तरप्रदेशात

मुंबई : महाराष्ट्रात हनुमान चालिसाच्या पठणाने सुरू झालेल्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या दाव्यावरून ठाकरे कुटुंबात स्पर्धा सुरू झाली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेऊन ते आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाण्याच्या घोषणेनंतर आता शिवसेनेनेही अयोध्येला जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तरप्रदेशात तिर्थयात्रेला सुरुवात केली आहे. (In the struggle of Thackeray brothers, Pawar reached Ayodhya, pilgrimage of Pawar family)

अधिक वाचा : एका फ्रेममध्ये ठाकरे परिवाराच्या पाच पिढ्या

ठाकरे बंंधूंचा व्होट बॅंकेवर डोळा

महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनंतर कट्टर हिंदुत्ववादी व्होट बँकेवरील पकड कमकुवत झाली आहे. अशा स्थितीत राज ठाकरेंनी त्या व्होटबँकेकडे डोळे लावले आहेत. राज ठाकरेंनी ५ जूनला अयोध्येची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहेत. 
राज ठाकरे 4 जून रोजी ते त्यांच्या समर्थकांच्या टीमसह अयोध्येत येत आहेत. येथील हॉटेल्सच्या त्यांच्या टीम मनसेने केलेल्या बुकिंगवरून त्याचे वेळापत्रक निश्चित होत आहे. तर 12 ते 14 मे दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हजारो शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार असल्याचेही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये बोलले जात आहे. या दौऱ्याची तयारी शिवसेना खासदार संजय राऊत सांभाळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील हॉटेलमध्ये शिवसैनिकांसाठी खोल्याही बुक करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा : NAVI MUMBAI | 20 तोळे सोने पॉलिशसाठी दिले, कारागीर झाला पसार,  दोन वर्षांनंतर आला ताब्यात 

उद्या पोहचणार अयोध्येत

अयोध्या आता महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या हिंदू दर्शन शर्यतीचा केंद्रबिंदू बनत आहे. हिंदुत्वाच्या राजकारणाचा वारसदार म्हणून टिकून राहण्याच्या शर्यतीपासून राष्ट्रवादीलाही दूर राहायचे नाही. त्यामुळे आमदार रोहित पवार आई-बाबांसोबत सहकुटुंब चार दिवसांच्या तिर्थयात्रेचं नियोजन केले आहे.  त्यांच्या तिर्थयात्रेची सुरवात अर्थातच महाराष्ट्राच्या कोटयवधी जनतेचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या दर्शनाने झाली. त्यानंतर तिर्थयात्रेच्या दुसऱ्या दिवशी राजस्थानमध्ये गेल्यानंतर सुरवातीला राधागोविंद मंदिराला भेट दिली. राधा गोविंद मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुष्करच्या ब्रम्ह मंदिरात पोहोचले. तेथून त्यांनी सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर येथील दर्गा गाठला. दर्ग्याला भेट देऊन ख्वाजा साहेबांवर चादर चढवून, माथा टेकवला. तिसऱ्या दिवशी सकाळी राजस्थानमधील मेहन्दीपूरच्या बालाजी मंदिरात बालाजी महाराजांना लाडू अर्पण केले. तेथून ते आम्ही पुढील प्रवासासाठी उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या दुपारी ते १२ वाजता अयोध्येत पोहचणार आहेत.  पवारांचा हा अयोध्या दौराही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ते रामललाचे दर्शन घेऊन मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी