Mumbai Taxi Strike: 'तर 15 सप्टेंबरपासून तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही टॅक्सी'

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 24, 2022 | 13:51 IST

Mumbai taxi union: आम्हाला भाडेवाढ न मिळाल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संपावर (Strike)जाणार असल्याचा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं (mumbai taxi union) दिला आहे.

Mumbai Taximen's Union
टॅक्सी कर्मचारी जाणार संपावर?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबई टॅक्सीमेन्स युनियन (Mumbai Taximen's Union) भाडेवाढसाठी (hike) आक्रमक झाली आहे.
  • आम्हाला भाडेवाढ न मिळाल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संपावर (Strike)जाणार असल्याचा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं (mumbai taxi union) दिला आहे.
  • सरचिटणीस ए.एल क्वाड्रोस (Secretary General AL Quadros) यांनी हा इशारा दिला आहे.

मुंबई: Increase Taxi fares Demand: मुंबई टॅक्सीमेन्स युनियन (Mumbai Taximen's Union)  भाडेवाढसाठी (hike)  आक्रमक झाली आहे. आम्हाला भाडेवाढ न मिळाल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संपावर (Strike)जाणार असल्याचा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं (mumbai taxi union) दिला आहे. सरचिटणीस ए.एल क्वाड्रोस (Secretary General AL Quadros)  यांनी हा इशारा दिला आहे. 

आम्हाला भाडेवाढ न मिळाल्यास गणेशोत्सवानंतर 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा  मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे (mumbai taxi union) सरचिटणीस ए.एल क्वाड्रोस यांनी दिला आहे. आम्ही 1  ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आम्हाला लिखित आश्वासन मिळालं. त्यामुळे आम्ही आमचे आंदोलन स्थगित केलं, असं त्यांनी सांगितले. 

अधिक वाचा- मुंबईत पुन्हा 26/11 हल्ल्याची धमकी देणारा सूत्रधार कतारमध्ये, यूपीत चौघांची चौकशी

पुढे क्वाड्रोस म्हणाले की, आता हे आश्वासन मिळून एक महिना होत आला आहे. तरी भाडेवाढीविषयी वारंवार पत्र व्यवहार करत आहोत. मात्र तरीही पत्राला साधी पोचपावतीही मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  1 मार्च 2021 ला झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण 32 रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी- रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रूपये जादा मोजावे लागत असल्याचं ते म्हणालेत. 

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनच्या मागण्या 

सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये आहे. त्यात दहा रुपयांची वाढ मिळावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्यात वाढ न मिळाल्यास गणपतीनंतर बेमुदत संपावर जाण्याचा इशारा क्वाड्रोस यांनी दिला आहे. 

2021 ला झाली होती भाडेवाढ 

2021 मार्चला टॅक्सीचे भाडे 22 रूपये जाले. तेव्हा तीन रूपयांची वाढ झाली. या वाढीत भाडे 25 रूपयांपर्यंत पोहोचले. तर रिक्षाचे भाडेही 18 रूपयांवरून 21 झालं होतं. दरम्यान सध्या सीएनजीचे दर प्रति किलोग्रॅम 80 रूपये आहे. 

अधिक वाचा-  Amitabh Bachchan: बिग बींनी 11.25 मि. केलं महत्त्वाचं Tweet, दिली स्वतःची Health Update

1 मार्च 2021 रोजी मिळालेल्या भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे 25 रुपये आहे. यामध्ये दहा रुपयांची वाढ करण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी