World Hindi Day 2022 : विद्यार्थ्यांच्या बोलण्यात हिंदी शब्दांची वृद्धी, ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम

students use hindi words when speaking marathi : करोना व्हायरसच्या संकटामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा नवा ट्रेंड सुरू झाला. टीव्ही माध्यम, कार्टून, सोशल मीडियाचे प्रस्थ वाढले असताना मातृभाषेत संवाद साधताना आपसूकच हिंदीचे शब्द बोलले जातात. हे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे.

Increase of Hindi words in students' speech, effect of online learning
विद्यार्थ्यांच्या बोलण्यात हिंदी शब्दांची वृद्धी, ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • करोनासंकटामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नवा ट्रेंड सुरू झाला
  • टीव्ही माध्यम, कार्टून, सोशल मीडियाचे प्रस्थ वाढले असताना मातृभाषेत संवाद साधताना आपसूकच हिंदीचे शब्द बोलले जातात.
  • लॉकडाऊनमुळे हे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटामुळे (Corona epidemic) जगभर विविध क्षेत्रांना त्याचा फटका बसला. या दोन- अडीच वर्षांमध्ये लोकांच्या जीवन बदलून गेले. त्यामध्ये शालेय मुलांपासून ते नोकरी करणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम केला. त्यामुळे रुजलेल्या अनेक वाटा बाजूला पडल्या आणि नवीन तंत्रज्ञान आणि पर्याय समोर आले. अगदी केजीपासून पीजीपर्यंत ऑनलाइन क्लास (Online class) घेतले. जशी आपली कार्य संस्कृती पूर्णपणे बदलली तशीच आपल्या भाषा संस्कृतीवर (Language culture) मोठा परिणाम झाला आहे. टाईम्स नाऊ मराठीच्या टीमने विविध शहरातील लोकांशी संवाद साधला त्यानंतर असं आढळून आलं आहे की अगदी खेड्यापाड्यापासून मेट्रो सिटीत राहणाऱ्या आणि जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या शाळांपासून काॅन्वेंटच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या बोलण्यात हिंदी शब्दांचा ट्रेंड हल्ली दिसत आहे. (Increase of Hindi words in students' speech, effect of online learning)

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे दोन वर्षे शाळा आणि महाविद्यालयांना टाळे लावले होते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे काम करुनही शिक्षकांसाठी तंत्रज्ञान नवीन होतं. त्यांनी ते आत्मसात केलं. त्यानंतर मुलांना शिक्षणाशी जोडण्याच काम केले. जवळजवळ दोन वर्षे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले. अगदी परीक्षाही ऑनलाइन घेतल्या गेल्या. करोना काळात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नवा ट्रेंड सुरू झाला. या नव्या तंत्रज्ञानाशी एकरुप होत असताना विद्यार्थी आणि पालकांना कसरत करावी लागली. 

सातारा जिल्ह्यातील लिंब जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सचिन माने म्हणाले, दिवाळीनंतर शाळा जेव्हा सुरु झाल्या तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थांना खूप आनंद झाला. शाळांमधील प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची मुलांचा उत्साह वाढला आहे. पण ते एकमेकांशी संवाद साधत असताना हिंदी भाषेचा वापर करीत आहेत. प्रत्येक वाक्यांमध्ये एकतरी हिंदी शब्द असतोच.

इनडोर एक्टिव्हिटींचा परिणाम

निर्बंधांमुळे मुलांशी शाळा, मैदान बंद असल्याने इनडोर गेम खेळण्याकडे कल वाढला. तसेच टीव्ही आणि मोबाईलवर कार्टून आणि एज्युकेशनल व्हिडोओ बघण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांच्यावर हिंदी भाषेचा प्रभाव झाला आहे. त्यामुळे ही मुलं मातृभाषेत संवाद साधताना आपसूकच हिंदीचे शब्द बोलले जातात. हे प्रमाण मागील काही दिवसांत वाढले आहे.

हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये शिकविणाऱ्या भाषा शिक्षिका रामेश्वरी यादव म्हणाल्या, महाराष्ट्रात 50 हून अधिक बोलीभाषा आहेत. मालवणी, घाटावरची, अहिराणी, आगरी, वऱ्हाडी तर आदिवासींमध्ये कातकरी, कोरकू अशा अनेक बोली भाषा आहेत. त्यामुळे ज्या भागात आपण लहानाचे मोठे होतो त्याठिकाणची स्थानिक भाषा आणि घरात बोलली जाणारी मातृभाषा याचाही आपल्या भाषेवर मोठा प्रभाव असतो. पण आता मातृभाषा आणि ज्या भाषेत शिक्षण घेत आहे त्या इंग्रजी भाषेसोबत हिंदीचा सर्रास वापर करतात. 

या हिंदी शब्दांचा वापर वाढला

मुझे याद नहीं आ रहा, छिपना, भूल गया, बडी मुश्कील है, खडे हाे जावाे, शुक्रिया,क्या कर रहे हाे, कैसे हो, जल्दी से आओ, खाना खाया क्या, मैने उसको बोला था.. सुनताईच नई, बहुत मजा आया, पूछो मत यार., हो जाएगा, सही जवाब, बिलकुल कर देंगे, मुझे पता नही, मुझे जाना है, किसने बोला, कम से कम असे असंख्य हिंदी शब्द मराठी बोलताना वापरले जातात.

पुण्यात इंजिनिअरिंग शिकणारा वैभव पवार सांगतो की, शाळा आणि महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये तर सर्रास मुलं इंग्रजी किंवा हिंदीतच बोलताना आढळतात. "महाविद्यालयात विविध भाषिक एकत्र शिकत असतात. त्यात शिक्षण इंग्रजीत दिलं जातं. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुलं एकतर इंग्रजी बोलतात किंवा हिंदी. संवाद साधण्यासाठी समोरच्या व्यक्तीला मराठी येत असेल याची खात्री नसते आणि आपल्याला इंग्रजी येत नसेल तर हिंदीतून बोलण्याची सुरुवात होते.

बोलण्यामध्ये विविध भाषांची सरमिसळ

सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शिकवण्यास सुरुवात केली. पण शहरांपासून दूरच्या खेड्यांमधील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी खराब नसल्यामुळे किंवा स्मार्टफोन नसल्यामुळे अजूनही वर्ग घेण्यास बराच त्रास सहन करावा लागत आहे. दूरदर्शन, रेडिओच्या माध्यमातून अनेक राज्य सरकारांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ विद्यार्थ्यांना यूट्यूबवर अपलोड करुन त्यांना शिकवले गेले. अजूनही अनेक राज्यांनी शाळा सुरू केलेल्या नाहीत. आता तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा ऑनलाइन क्लास सुरु झाले आहेत. त्यामुळे आणखी त्यांच्या बोलण्यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेंची सरमिसळ झालेली पाहायला मिळेल. महाराष्ट्रात हिंदी सिनमांचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. त्यामुळे महाराष्ट्रात हिंदी भाषेची वृद्धी झाल्याचं आढळून येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी