रत्नागिरी: गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत बॅकफूटला गेलेल्या माजी मंत्री रामदास कदम यांनी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या १४ मे रोजी मुंबईत होणाऱ्या सभेला येण्याचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे हे निमंत्रण म्हणजे रामदास कदम आणि 'मातोश्री'मध्ये झालेला मनोमिलनचा संकेत देत आहे. (Invitation to Ramdas Kadam for Uddhav Thackeray's meeting in Mumbai)
अधिक वाचा :
Maharashtra Covid Update : राज्यात आज कोरोनामुळे दोघांचा रुग्णाचा मृत्यू, २४ तासांत आढळले २४० रुग्ण
शिवसेना पक्ष नेतृत्व हे रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. रामदास कदमही शिवसेना पक्षसंघटनेतही सक्रीय नव्हते. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर राष्ट्रवादीसोबत युती करून कोकणातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. कदमांच्या पत्रकार परिषदेमुळे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून राज्यात सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील मतभेद पहिल्यांदाच चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी ते कायम शिवसैनिक राहतील आणि कधीही शिवसेना पक्ष सोडणार नाहीत, असे सांगितले होते.
अधिक वाचा :
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थान भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांच्या मध्यस्थीने शिवसेना आणि रामदास कदमांच्या पुन्हा मनोमिलनाची सुरुवात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा :
रामदास कदम यांनी लिहलेल्या 'जागर कदम वंशाचा' या पुस्तकाच्या खेड, जि. रत्नागिरी येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी शिंदे यांनी रामदास कदम यांना शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले. तर रामदास कदम यांनी आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाल्याचे सांगितले. मला सभेसाठी बोलावणं आलं आहे पण मी सभेला जाणार नाही.
अधिक वाचा :
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ
या कार्यक्रमाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन कीर्तिकर, राज्याचे गृह आणि वित्त नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ शेकाप नेते आमदार जयंत पाटील, आमदार योगेश कदम आणि खेड-दापोली विभागातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.