राज-उद्धव ठाकरेंबाबत निलम गोऱ्हे म्हणाल्या, असं काही

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगली शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज ठाकरे व भाजपवर टीकेची झोड उठवली.

It could be Raj Thackeray's political game ', Neelam Gorhe's big allegation
राज-उद्धव ठाकरेंबाबत निलम गोऱ्हे म्हणाल्या, असं काही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • निलम गोरे यांचे वादग्रस्त वक्तव्य
  • राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो
  • भाजप राज ठाकरेंना काम झाले की वाऱ्यावर सोडेल,

सांगली : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करत असले तरी भाजप विरोधात मात्र त्यांनी मौन पाळल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. इतकंच नाही तर राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. (It could be Raj Thackeray's political game ', Neelam Gorhe's big allegation)

अधिक वाचा : 

Maharashtra ZP Elections : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलं, 5 जूनला मतदान तर 6 जूनला मतमोजणी

उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सांगली शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज ठाकरे व भाजपवर टीकेची झोड उठवली.

अधिक वाचा : 

विजेच्या तुटवड्याचा मंत्र्यांना फटका; बत्ती गुल होताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मुख्यमंत्री गायब

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राजकीय गेम म्हणजे त्यांच्यासोबत भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत. पण भाजप काम झाले की राज ठाकरे यांना वाऱ्यावर सोडेल. इसापनीतीची कथा अशीच आहे. आम्ही भाजपचा अनुभव घेतला आहे. भाजप त्यांनी तिकीट वाटपावेळी वाऱ्यावर सोडून देईल. कारण भाजपला उत्तर भारतीयांची मतं हवी असतात. त्यामुळे हा धडा त्यांना लक्षात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी