मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांसोबत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने सर्व पक्षांमध्ये उमेदवारीवरुन इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, आज भाजपने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी ज्या ५ उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा गिरीश खापरे यांचा समावेश आहे. या उमेदवारीवरुन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील नाराज असल्याची चर्चा सुरु असताना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भाजप नेतृत्वावर टिका केली आहे. (It shows where the politics of BJP is going, said Vinayak Mete after his candidature)
अधिक वाचा :
हिंमत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन..., उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्ला
विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय दौंड, शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड हे सदस्य निवृत्त होणार आहे. तर भाजपचे रामनिवास सिंह यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे.
अधिक वाचा :
UPSC परीक्षेत अपयश झाल्याने उचललं हे पाऊल, विद्यार्थ्याने कवटाळले मृत्यूला
विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे चार तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. तर कॉंग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र दहाव्या जागेसाठी कॉंग्रेसला मतांची गरज असून या जागेसाठी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. आज भाजपचे मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांना डावलून भाजपच्या निष्ठावानांना संधी दिली आहे.
अधिक वाचा :
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी बुधवारी सांगितले की भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या मित्रपक्षांशी विश्वासघात करू नये. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्यानंतर मेटे यांची वक्तव्य आली आहे. मेटे, जे 2016 मध्ये भाजपच्या कोट्यातून एमएलसी म्हणून बिनविरोध निवडून आले होते, त्यांना भाजपकडून आणखी एक संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपने शिवसंग्रामसह त्यांच्या एकाही मित्रपक्षाला जागा दिली नाही.
अधिक वाचा :
“भाजपने मित्रपक्षांनी दाखवलेल्या विश्वासाचा विश्वासघात करू नये. तुम्ही मित्रपक्षांना हलके घेऊ शकत नाही. तुम्ही पूर्वी सहकाऱ्यांची मदत घेतली होती आणि आता तुम्हाला त्यांना बायपास करायचे आहे. भाजपसाठी हे चांगले लक्षण नाही. विनायक मेटे पुढे म्हणाले की, "मी भाजपचे (प्रदेश) अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. आम्हाला त्यांचा मुद्दा समजून घ्यायचा आहे... पण भाजप जर मित्रपक्षांना महत्त्व देत नसेल, तर त्याचे राजकारण कुठे चालले आहे हे दिसून येते. अशा परिस्थितीत मित्रपक्षांनाही स्वतंत्र निर्णय घ्यावे लागतील.