Eknath Khadse: गिरीश महाजनांनी केली तक्रार, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर खडसे अडचणीत; 'त्या' कारभाराची होणार चौकशी

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 29, 2022 | 08:03 IST

NCP leader Eknath Khadse: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांच्या अडचणीत भर पडली. शिंदे आणि फडणवीस सरकारनं (Shinde and Fadnavis Government) त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Eknath Khadse
एकनाथ खडसे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांच्या अडचणीत भर पडली.
  • मंदाकिनी खडसे गेल्या सात वर्षांपासून दूध संघाच्या अध्यक्ष आहेत.
  • आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan) यांनी केलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडून चौकशीचे निर्देश देण्यात आलेत.

जळगाव:  Jalgaon District milk union Investigation: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse)  यांच्या अडचणीत भर पडली. शिंदे आणि फडणवीस सरकारनं (Shinde and Fadnavis Government) त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse)  या अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघातील (Jalgaon District Milk Union)  गैरकारभाराची चौकशी होणार आहे. मंदाकिनी खडसे गेल्या सात वर्षांपासून दूध संघाच्या अध्यक्ष आहेत. या सहकारी कारभारातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी सरकारतर्फे समिती नियुक्त करण्यात आली आहे. आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan)  यांनी केलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्याकडून चौकशीचे निर्देश देण्यात आलेत. 

चौकशीचे निर्देश मिळाल्यानंतर 28 जुलै रोजी तातडीनं उपसचिवांकडून पाच लेखापरीक्षकांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. येत्या 20 ऑगस्टपर्यंत समितीला चौकशी अहवाल सादर करण्याचे पत्र काढण्यात आले आहे. 

अधिक वाचा-  3 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार 101 टक्के निश्चित?, आमदारांना सांगितला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांचा प्लान 

दरम्यान एकनाथ खडसेंना दुहेरी झटका बसला आहे. कारण विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार तसेच दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  

दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये संपली आहे. त्याला महाविकास आघाडीकडून मुदतवाढ देण्यात आली होती. जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नागराज पाटील यांनी जिल्हा दूध संघाच्या कारभारातील अनियमितता आणि भरती प्रक्रियेतील मोठ्या गैरव्यवहार झाल्याची तक्रार सरकारकडे केली होती. या तक्रारीनंतर चौकशी लावण्यात आली आहे. तसंच तक्रारदार पाटील यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी व्हावी, असं पत्र आमदार गिरीश महाजन यांनी 8 जुलै रोजी सरकारला दिलं. त्या पत्राचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी संघाच्या गैरकारभाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर उपसचिवांनी दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या आयुक्तांना चौकशीचे पत्र दिलं आहे. यात पाच जणांच्या चौकशी समितीचा उल्लेख करण्यात आला आहे. 

चौकशीसाठी समितीची नियुक्ती करण्यात आल्यानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं. यासंदर्भातले आदेश राज्य सरकारचे उपसचिव एन.बी.मराळे यांनी काढलेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा-  राज्यातील 'या' भागांत उद्या मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बरसणार पाऊस

चौकशी समितीमध्ये  मुंबई येथील विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 स.शा. पुरव यांच्या अध्यक्षतेखाली लेखापरीक्षक कै.मो. दवळी, आर.ई. नलावडे, यो.र. खानोलकर आणि जु.रू. तडवी या पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी