मुंडे बहीण -भावात लागली चढाओढ! येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत या मुलीला राजकारणात मान खाली घालायला लावू नका-
पंकजा मुंडे जर तुम्ही मला 2019 च्या निवडणुकीत जिंकून आणले असते तर महराष्ट्राच्या राजकारणात चित्र काही वेगळेच असते-पंकजा मुंडे स्त्री पुरुष भेद बाजूला ठेऊन आता विकास करूया-पंकजा मुंडे
सुकेशनी नाईकवाडे(बीड):-
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत त्या निमित्त बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील गावा गावात जलजीवन मिशन अंतर्गत भूमिपूजन समारंभ जोरदार पार पाडत आहेत यामध्ये मुंडे बहीण भावात चढाओढ लागल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. पंकजा मुंडे यानि आगामी 2024 च्या निवडणुकीस चांगलीच कंबर कसल्याचे ही पाहवयास मिळत आहे.
पंकजा मुंडे गावकऱ्यांना संबोधन करताना म्हणाल्या की, मी या जिल्ह्याची पालकमंत्री, व ग्रामविकास मंत्री असताना या जिल्ह्यातील दवाखाने, शाळा, स्मशानभूमी, पाणी , तर गावातील अंधार दूर करण्यासाठी हाईमास्ट चे दिवे लावले 25/15 च्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला .
अधिक वाचा : Railwayच्या एका डब्यात किती सीट आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
एखादा माणूस मंत्री बनतो तर त्याचे काम असते की त्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे हे दुर्दैव आहे आपलं सरकार नसताना या गावात अंधार झाला मात्र आज आमचे सरकार आले अन या गावात परत उजेड पडला.
या महाराष्ट्रमध्ये खूप वेगळं गणित राहील असत जर मी परळी मधून मी निवडून आले असते जर मी परळीचा विजय घेऊन मी मुंबईला गेले असते मात्र मी खचून गेले नाही ज्या लोकांनी मला 92हजार मत दिली त्या लोकांचे मी सेवा करत राहिले हे माझे कर्तव्य होत
आज तरुण कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत ताई तुम्ही या आमचे खूप चुकले तुम्ही आम्हाला किती दिल खूप दिल बोलणारांचे आंबाडे विकतात नाही बोलणारांचे गहू सुद्धा विकले जात नाहीत तसच माझं ही झालं मी बोलले नाही तर मी देत राहिले म्हणूज जर तुम्ही मला 2019 च्या निवडणुकीत जिंकून आणले असते तर महराष्ट्राच्या राजकारणात चित्र काही वेगळेच असते.
येणाऱ्या निवडणुकीत या मुलीला राज्याच्या राजकारणात तुम्ही तिला मान खाली घायला लावू नकात. ग्रामपंचायतीत तुम्ही मुहूर्त मेड रोवली येणाऱ्या निवणुकीय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, लोकसभा, विधानसभा, या सर्व निवडणुकीत तुम्ही निश्चिय करा की 20 मार्च 2024 पर्यंत ताई म्हणत्यात त्याच नेत्यांना मतदान करा. असे ही बोलताना पंकजा मुंडे म्हणल्या. मी स्त्री आहे म्हणून मी कोणाला सूड उगवला नाही, मी कोणावर खोट्या केस केल्या नाही, स्त्री म्हणून माझ्या कामाचे नारळ त्या पुरुषांनी फोडले पण तुम्हाला काळलेच नाही म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला टोला. स्त्री अन पुरुष जर भेद असेल तर घरातील प्रत्येक स्त्रियांनी आता ठरवले पाहिजेत की मत देताना ताई लाच द्यायचे आहे म्हणून स्त्रीला नुसत मान वर करुन बघणं माफी नाही, मात्र पुरुषांना सर्व काही माफ आहे मग एक स्त्री राजकर्णी झाली तर मग ती विकास चांगलाच करते असे पंकजा मुंडे यांनी बोलताना म्हटले
अधिक वाचा : रेल्वेत अप्पर बर्थवरील व्यक्तीला रेल्वेचा विशेषाधिकार, जाणून घ्या
मुंडे साहेब 40 वर्षे राजकारणात होते, विलासराव देशमुख हे त्यांचे चांगले मित्र होते पण ते दोघे कधी एकमेकांच्या विकासाच्या आड आले नाही, रजनीताई पाटील केशर काकू यानी ही विकास घडवून आणला भलेही पक्ष वेगळी राहिली मात्र कोणी कोणाच्या विकासामध्ये आड आले नाही म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे वर साधला निशाणा.ॉ