राणा दाम्पत्याच्या जामिनावर झालेल्या सुटेनंतर अमरावतीत जल्लोष; दुसरीकडे मुंबईतील घराची चौकशी करण्यासाठी बीएमसी दाखल 

Hanuman Chalisa Row:खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने राणा दाम्पत्य मीडियाशी बोलणार नाही आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी अट ठेवली आहे.

Jallosh in Amravati after Rana couple's bail release; On the other hand, BMC filed an inquiry into the house in Mumbai
राणा दाम्पत्याच्या जामिनावर झालेल्या सुटेनंतर अमरावतीत जल्लोष; दुसरीकडे मुंबईतील घराची चौकशी करण्यासाठी बीएमसी दाखल ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राणा दाम्पत्याला सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला
  • मुंबई महापालिकेचं पथक रवी राणा यांच्या खारमधील घरात दाखल
  • घराच्या आराखड्यात छेडछाड करुन बेकायदा बांधकाम केल्याचा संशय

मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने अट घातली आहे. त्याचवेळी जामीन मिळाल्यानंतर बीएमसीचे पथक बेकायदा तपासासाठी खार येथील राणा दाम्पत्याच्या फ्लॅटवर पोहोचले. (Jallosh in Amravati after Rana couple's bail release; On the other hand, BMC filed an inquiry into the house in Mumbai)

अधिक वाचा : भोंग्यांचा वाद : सर्वांनी परवानगी घेतलीय कारवाई करण्याची गरज नाही - संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचण्याची धमकी दिल्याने या जोडप्याला 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या जोडप्याला 24 एप्रिल रोजी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राणा दाम्पत्याला ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मिळाला. त्याच वेळी, तो कोणत्याही विषयावर पत्रकारांना संबोधित करणार नाही आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलावल्यास २४ तास अगोदर नोटीस द्यावी लागेल, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे.

अधिक वाचा : चारकोप परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी स्पीकरवर वाजवले अजान दरम्यान हनुमान चालीसा

दुसरीकडे, खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी