Thane : 'हर हर महादेव' वरुन राडा, जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटगृहातला शो थांबवला

Har Har Mahadev movie : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाण्यातील एका चित्रपटात सुरू असलेल्या हरहर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला. दरम्यान, एका प्रेक्षकाला मारहाण केल्याची घटनाही घडली आहे.

Jitendra Awhad stop show of movie HarHarMahadev in Thane
Thane : 'हर हर महादेव' वरुन ठाण्यात राडा, जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटगृहातला शो थांबवला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद
  • जितेंद्र आव्हाड समर्थकांकडून प्रेक्षकाला मारहाण
  • थिएटर जबरदस्तीने रिकामे करण्यात आल्याचा आरोप

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोपावरुन हर हर महादेव या मराठी चित्रपटाला राज्यभरातून विरोध होत आहे. संभाजी ब्रिगेडच्यावतीने सकाळी पुण्यात हर हर महादेव चित्रपटाचे शो पाडण्यात आले आहे. त्यानंतर रात्री उशिरा ठाण्यामध्येही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनीही थेट चित्रपटगृहात घुसून चित्रपटगृह रिकामे करत हर हर महादेवचा शो बंद पाडला. (Jitendra Awhad stop show of movie HarHarMahadev in Thane)

अधिक वाचा : 'हर हर महादेव', 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमांत इतिहासाचा विपर्यास, संतापलेल्या संभाजीराजेंनी केली 'ही' मागणी

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि समर्थकांनी ठाण्यातील विवीयाना माॅलमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडला आहे. हरहर महादेव चित्रपटातून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप जितेंद्न आव्हाड केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेतल्याचं दाखवलंय ते तसं नाही, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासंदर्भात जे दाखवलं ते इतिहासाला धरुन नाही. 

अधिक वाचा : Prashant Damle record : दामलेंच्या प्रशांतची 'विक्रमी' गोष्ट, बहुरूपी 12 हजार 500 प्रयोग

यावेळी आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या कार्याकर्त्यांसह मल्टिप्लेक्समध्ये शिरत घोषणाबाजी करत शो बंद पाडला.  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनंती करून प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर जाण्याची विनंती करीत होते. त्यावेळी काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. त्यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली. यामुळे चित्रपटागृहात ताणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघडी घेतली. मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात जाऊन शो पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.  त्यानंतर काही वेळानंतर चित्रपटाचा शो पुन्हा सुरु झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी