Mumbai News: दादरमधल्या 'या' प्रसिद्ध दुकानाच्या मालकाच्या मुलाची आत्महत्या, विरारमध्ये आढळला मृतदेह

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 21, 2022 | 10:32 IST

Kalpesh Maru Committed suicide: सुविधा स्टोअरचे मालक शांतीलाल मारू (Shantilal Maru) यांचे 46 वर्षीय मुलगा कल्पेश मारू (Kalpesh Maru) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा (committed suicide) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Suvidha Showroom owner son committed suicide
दादरमधल्या 'या' प्रसिद्ध दुकानाच्या मालकाच्या मुलानं संपवलं जीवन 
थोडं पण कामाचं
  • कल्पेश मारू (Kalpesh Maru) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा (committed suicide) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका फार्महाऊसच्या गेटजवळ त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे.
  • जवळच्या फार्महाऊसच्या मालकानं ही माहिती वसईतल्या मांडवी पोलिसांना दिली.

मुंबई: owner of Suvidha Showroom Son Kalpesh Maru Committed suicide: मुंबईतून बेपत्ता झालेले दादरमधील (Dadar)  प्रसिद्ध सुविधा स्टोअरचे मालक शांतीलाल मारू (Shantilal Maru)  यांचे 46 वर्षीय मुलगा कल्पेश मारू (Kalpesh Maru)  यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा (committed suicide)  धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या आत्महत्येनं व्यापार जगताला धक्काच बसला आहे. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका फार्महाऊसच्या गेटजवळ त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे. कल्पेश मारू यांचा मृतदेह गुरूवारी विरार, शिरसाड येथे मुंबई- अहमदाबाद महामार्गाशेजारी एका झाडीमध्ये आढळून आला. त्यानंतर जवळच्या फार्महाऊसच्या मालकानं ही माहिती वसईतल्या मांडवी पोलिसांना दिली. 

अधिक वाचा- ढगफुटीचे तांडव; अतिवृष्टीत 33 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता, जाणून घ्या देशातल्या पावसाची सद्यस्थिती

कल्पेश हा दादरमधील प्रसिद्ध सुविधा दुकानाचे मालक शांतीलाल मारू यांचा मुलगा आहेत. कल्पेश मारू हे 15 ऑगस्टपासून बेपत्ता होते. ते बेपत्ता असल्याची तक्रार दादर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. 18 ऑगस्ट रोजी विरारजवळील शिरसाड फाट्याजवळ पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. त्यांच्या मृतदेहाजवळ एक बाटली आणि गोळ्यांची रिकामी पाकिटं सापडली. त्यामुळं कल्पेश यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. 

दरम्यान शिरसाडच्या ओम साई रूग्णालयात डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केलं.  पोलिसांना मारू यांच्या खिशात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आयफोन सापडला आहे. 

सोमवारी वडिलांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर कल्पेश मारू यांनी बुधवारी घर सोडल होतं. मात्र ते पुन्हा परत न आल्यानं कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना वाचवण्यात यश आलं होतं, अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी दिली आहे.  कल्पेश हे मानसिक रुग्ण होते आणि यापूर्वी देखील त्यांनी चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांचे वडील शांतीलाल मारू यांनी दिल्याची माहिती प्रफुल्ल वाघ यांनी दिली.

ते विरारला कसे आले त्याचा आम्ही तपास करत आहोत. मात्र या मागे कुठलाही घातपात नसून या प्रकरणी आम्ही अकस्मात मृत्युची नोंद केल्याची माहिती वाघ यांनी दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी