Abhijeet Bichukale : अभिजित बिचुकले आणि आनंद दवेंची पडली विकेट, मिळाली इतकी कमी मतं

Abhijeet Bichukale : अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून (Kasba Bypoll Results) आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत.

kasaba byelection Deposits of Anand Dave and Abhijit Bichukale seized
अभिजित बिचुकले आणि आनंद दवेंची पडली विकेट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला (Kasba Bypoll Results) आज सकाळी सुरुवात झाली
  • या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
  • अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून (Kasba Bypoll Results) आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत.

Abhijeet Bichukale Anand Dave Kasba Bypoll Results : कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला (Kasba Bypoll Results) आज सकाळी सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कसबा निवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले असून त्यांच्या विजयापेक्षा  अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि आनंद दवे (Anand Dave) यांना पडलेल्या मतांची चर्चा जास्त रंगली आहे.

अभिजीत बिचुकलेला कसबा मतदारसंघातून (Kasba Bypoll Results) आतापर्यंत 47 मतं मिळाली आहेत. तर आनंद दवे यांना 296 मतं मिळाली आहेत. अभिजित बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतांनी चांगलीच रंगत आणली आहे. दोघांच्याही मतांची आकडेवारी अत्यंत निराशाजनक आहे.

अभिजीत बिचुकलेचा मोठा चाहतावर्ग असूनही पहिल्या फेरीत त्याला फक्त 4 मतं मिळाली होती. तर दुसरीकडे ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा आहे असा दावा करणाऱ्या आनंद दवे यांना 12 मतं मिळाली होती. अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांच्यापेक्षा यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला अधिक मतं पडली आहेत. 

अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात

'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकलेने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. कसबा मतदारसंघातून अभिजीत बिचुकले उभा राहिल्याने ही निवडणूक खूपच रंजक होत चालली आहे. दवे आणि बिचुकले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून बिचुकले चर्चेत आहे. कसबा हा बिचुकलेचा मतदारसंघ नसतानाही त्याने आपल्या खास शैलीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


कसबा पोटनिवडणुकीच्या मैदानात अभिजित बिचुकलेंची चर्चा

कसबा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात असताना कसब्यात मात्र अभिजीत बिचुकलेची जोरदार चर्चा होती. कसब्यात अभिजीत बिचुकलेने जोरदार प्रचार केला होता. जास्तीत जास्त लोकांना भेट देऊन बिचुकलेने प्रचार केला होता. अभिजीत बिचुकलेला कपाट हे चिन्ह मिळालं होतं. पाणी, रस्ते या मुलभूत प्रश्नांवर कवी मनाचे नेते म्हणून ओळख असलेल्या अभिजीत बिचुकलेने भर दिला होता. 

अभिजीत बिचुकले कायम चर्चेत!

'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. बिचुकलेने आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून त्याला यश आलेलं नाही. बिचुकलेला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा त्याने याबद्दल भाष्य केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी