KCR यांनी टाकले महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल, अब की बार किसान सरकार'चा नारा

k chandrashekhar rao in maharashtra : सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केसीआर यांची त्यांच्या राज्याबाहेरील ही पहिलीच सभा आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. नांदेडमध्ये केसीआर भारत राष्ट्र समितीच्या बॅनरखाली रॅली काढत आहेत.

KCR steps into Maharashtra politics, Ab Ki Baar Kisan Sarkar slogan
KCR यांनी टाकले महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल, अब की बार किसान सरकार'चा नारा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नांदेडमध्ये केसीआर रॅली काढत आहेत
  • भारत राष्ट्र समितीची पहिल्यांदाच तेलंगाणाबाहेर

नांदेड : सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केसीआर यांची त्यांच्या तेलंगणा राज्याबाहेर नांदेडमध्ये पहिलीच सभा झाली. यावेळी केसीआर यांनी, 'अबकी बार किसान सरकार'.. असा नारा देत आता आपल्याला राष्ट्रीय पातळीवर जायचे आहे, असे संकेत दिले आहेत. यानंतर केसीआरने देशाच्या इतर भागातही रॅली काढण्याची योजना आखली आहे. (KCR steps into Maharashtra politics, Ab Ki Baar Kisan Sarkar slogan)

अधिक वाचा : भारताचा चीनवर पुन्हा डिजिटल स्ट्राईक; 232 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

नांदेडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, बरेच लोक येतात आणि लांबलचक भाषणे देऊन निघून जातात. 'मन की बात' करून ते निघून जातात. 75 वर्षांनंतरही देशाला पाणी, वीज मिळत नाही. देशात पोकळ भाषणे सुरू आहेत, शेतकऱ्यांकडे कोणाचे लक्ष नाही.

अधिक वाचा : Parvez Musharraf death: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करताना बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव म्हणाले, आज मेक इन इंडिया हा विनोद बनला आहे. मेक इन इंडिया कुठे गेला? सर्व काही चीनमधून येत आहे. प्रत्येक गल्लीत चायना मार्केट आहे. मेक इन इंडिया असेल तर चीनच्या बाजारपेठेऐवजी भारताची बाजारपेठ स्थापन झाली पाहिजे. केसीआर म्हणाले, जर तुम्ही किसान सरकार, बीआरएस सरकार बनवले तर दोन वर्षांत तुम्ही देशाचे नाव उजळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी