पैसा लईच वंगाळ ! सुपारी देऊन एकमेकांची काढतायत आब्रु!

Ahmednagar crime : अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाणे अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरत आहे. सध्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये एक अनोखी स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीसांची प्रतिमा मलिन होत आहे.

Kotwali police compromise with the accused
पैसा लईच वंगाळ ! पोलीसच सुपारी देऊन एकमेकांची काढतायत आब्रु!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कोतवाली पोलीस ठाणे अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरले
  • पोलिसांकडून अवैध धंद्यातील मुख्य आरोपीशी तडजोड
  • अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्ह्यांच्या उकलाची जबाबदारी

अहमदनगर : आयुष्यभर दुःखांना कुरवाळीत फाटका संसार चालवणाऱ्या त्या सामन्यांच्या नावे कोट्यवधीचा कर्ज घेत बँकेला गंडा घालणाऱ्या आरोपींना कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी अटक केली. कोतवाली पोलिसांनी केलेली कारवाई ही खरी कौतुकास्पदच आहे यात तिळमात्र शंका नाहीच. मात्र या कारवाई भोवती सुरू असलेल्या चर्चेमुळे पोलिसांच्या आब्रुची लक्तरे वेशीला टांगल्याने आता पोलिस अधीक्षकांनीं लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे. (Kotwali police compromise with the accused)

अधिक वाचा : PM मोदींना शेतकऱ्यांचं अनोखं गिफ्ट, २१ कांद्यावर मोदींचे चित्र रेखाटून मांडल्या समस्या, पाहा Video

कोतवाली पोलिसांनी केलेल्या बनावट सोने तारण घोटाळ्याच्या कारवाईचे कौतुक राज्यभर होतं असतांना त्याचं ठाण्यातील लाल कट्ट्यावर सुरू असलेल्या एक ना अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कधी शहरात सुरू असलेल्या कत्तलखाण्या संदर्भात होणारी तडजोड तर कधी बनावट सोने तारण मधील मुख्य आरोपीशी केलेली तडजोड तर कधी गुटखा व्यापाऱ्यांशी हातमिळवणी! मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अशा चर्चा होतं असतांना साधी चौकशीची करण्याची तत्परता देखील कोणा अधिकाऱ्यांनी दाखविली नाही. तर दुसरीकडे सुपारी देऊन एकमेकांविरुद्ध षडयंत्र केले जाते कोण खरं कोण खोटं यासाठी एकदा चौकशी व्हायलाच पाहिजे त्या मुळे पोलीस खात्याची प्रतिमा मालिन होणार नाही.

अधिक वाचा : अरबी समुद्रात बुडत असलेल्या १९ जणांना तटरक्षक दलाने वाचवले

खरंतर पोलिस ठाण्यातील लक्तरे वेशीवर टांगणीला लावण्यासाठी जबाबदार कोण आता हाच प्रश्न पडलाय?  ज्यांनी तडजोडी करून लक्तरे टांगली ते का ज्यांनी तडजोडीच्या चर्चा गावभर केल्या ते अधिकारी की ज्यांना अशा चर्चा माहीत असतांना देखील कारवाईचे धाडस दाखवले नाही!  

एकीकडे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व जाती धर्मातील प्रमुखांना, नागरिकांना विश्वासात घेऊन संवाद मेळावे आयोजित करून पोलिसांप्रती नागरिकांमध्ये असलेली भिती दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे कोतवालीच्या पडद्यावर सुरू असलेल्या चर्चेच्या मालिकेमुळे पोलिसांचीच लक्तरे वेशीवर टांगणीला लागल्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती असलेला विश्वास अशा प्रकारामुळे दूर होतांना दिसत आहे. त्यामुळे आता खुद्द जिल्हा पोलिस प्रमुखांनीच शहरात ऐकू येणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून झालेल्यां तडजोडी संदर्भात योग्य ती माहिती घेऊन चौकशी करण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी