Baramati News: जमिनीचा वाद टोकाला, छोट्या भावाकडून कुऱ्हाडीनं थोरल्या भावाची हत्या; बारामती हादरलं

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 15, 2022 | 14:43 IST

Baramati Crime News: बारामती येथे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीने (Axe) निर्घृण हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे.

 Representative Image
बारामती मोठ्या भावाची हत्या 
थोडं पण कामाचं
  • पोलिसांना घटनास्थळावर अनेक पुरावे ही मिळाले आहेत.
  • बारामती येथे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीने (Axe) निर्घृण हत्या केली.
  • पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पुणे:  Maharashtra Crime: बारामतीत (Baramati)  जमिनीच्या वादावरून (Land Dispute) हत्या झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बारामती येथे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीने (Axe) निर्घृण हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेत आरोपी ही जखमी (Injured) झाला आहे. ज्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळावर अनेक पुरावे ही मिळाले आहेत. बारामतीचे डीएसपी गणेश इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तायप्पा सोमा मोटे  (60)  आणि त्याचा लहान भाऊ रामा मोटे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वादावरून भांडण सुरू होतं. हत्येच्या दोन दिवस अगोदर मृत तायप्पा यांनी जमिनीवर जाण्याचा मार्ग बंद करून ठेवला होता. येथूनच हत्येची कहाणी सुरू झाली. 

अधिक वाचा- 'राजा राणी ची गं जोडी' मालिकेचा स्वातंत्र्यदिन स्पेशल एपिसोड 

पोलीस काय म्हणाले 

डीएसपीच्या म्हणण्यानुसार, रस्ता बंद करण्यावरून दोघांच्या कुटुंबात सुरू झालेल्या किरकोळ भांडणाचे रुपांतर हाणामारीत झालं. परस्पर वैमनस्य इतके वाढले की दोघांनी एकमेकांना मारण्याच्या उद्देशाने आपापल्या घरातून शस्त्रे उचलली. यानंतर धाकटा भाऊ रामा मोटे याने तायप्पावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेत आरोपी रामाही गंभीर जखमी झाला आहे. ज्याच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

आरोपींवर गुन्हे दाखल

बारामती डीएसपी यांनी पुढे सांगितलं की, या घटनेबाबत अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. रामा मोटे याच्यावर हत्येसह इतर अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येच्या गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. हा वाद इतका वाढला की हत्या करावी लागली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी