Tait Exam 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख...; असे करा रजिस्ट्रेशन

Tait Exam Date 2023 in Marathi : महा TAIT परीक्षा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे. येथे पात्रता आणि इतर तपशील तपासा....

Last date to apply online for Tait Exam 2023...
Tait Exam 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख...; असे करा रजिस्ट्रेशन   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली
  • ३१ जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
  • परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी तीन दिवस बाकी आहेत

Tait Exam Date 2023 in Marathi : शिक्षक होण्याची इच्छा बाळगणाऱ्या ज्या उमेदवारांनी बीएड, डीएड केलं आहे. अशा लोकांसाठी TAIT परीक्षा देण्यासासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.31 जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. या परिक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची मुदत संपत असून  12 फेब्रुवारी 2023 ही शेवटची तारीख आहे. (Last date to apply online for Tait Exam 2023...)

अधिक वाचा : Pradnya Satav थोडक्यात बचावल्या! हिंगोलीत काॅंग्रेसच्या आमदारांवर प्राणघातक हल्ला

ज्या लोकांना अध्यापनात आपले करिअर करायचे आहे. अशा लोकांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2023 या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. 

अधिक वाचा : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले गुरुवार 9 फेब्रुवारी 2023चे भविष्य; 'या' राशींवर राहणार गणपतीची कृपादृष्टी

TAIT परीक्षा देण्यासासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 31 जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची मुदत 12 फेब्रुवारी 2023 असणार आहे. 

Maharashtra TAIT Exam Important Dates 2023

Event  Dates
Maha TAIT Notification Release Date 31st January 2023
Start Date to Apply for Maha TAIT Exam 31st January 2023
Last Date to Apply. 12th February 2023.
Maha TAIT Admit Card 2023 15th February 2023
Maha TAIT Exam Date 2023 22 February to 3rd March 2023

अर्ज कसा भरायचा

  1.  https://www.mscepune.in/ किंवा https://www.ibps.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2.  होम पेजवर, “MSCEP- शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)- 2022 वर क्लिक करा
  3. एक पेज पृष्ठ दिसेल, आता "न्यू रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा" या लिंकवर क्लिक करा.
  4.  महा TAIT परीक्षा अर्ज फॉर्म 2023 स्क्रीनवर दिसतो. अर्जामध्ये आवश्यक तपशील भरणे सुरू करा.
  5. आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा आणि आवश्यक अर्ज फी भरा.
  6. भविष्यातील संदर्भासाठी तुमचा महा TAIT अर्ज डाउनलोड करा.... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी