उदयनराजे आक्रमक; शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या 'त्या' वक्तव्याविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र

गावगाडा
भरत जाधव
Updated Dec 09, 2022 | 11:59 IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari )छत्रपती शिवाजी महाराज  ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी (controversial statement) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle)आक्रमक असून त्यांनी पंतप्रधान कार्यलयात पत्र पाठवले आहे.

 udayanraje bhosale
राज्यपालांविरोधात उदयनराजे आक्रमक,पीएमओला दिलं पत्र   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली.
  • छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे.

Udayanraje Bhosle : नवी दिल्ली :  खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर उदयनराजे यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र दिले असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी (Governor Bhagat Singh Koshyari )छत्रपती शिवाजी महाराज  ( Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी (controversial statement) भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle)आक्रमक असून त्यांनी पंतप्रधान कार्यलयात पत्र पाठवले आहे. ( Letter to the Prime Minister's Office against 'that' statement of Governor regarding Shivaji Maharaj)

अधिक वाचा  : लग्नसमारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट, 60 जण होरपळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला (PMO)पत्र पाठवलं असल्याचे त्यांनी सांगितले.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत आहे, असं त्या पत्रात नमूद केलं होतं, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.

अधिक वाचा  : अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

जनतेमध्ये असंतोष

उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे, शिवभक्त नाराज आहेत. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं योग्य नव्हे, या मुद्द्याकडे राजकीय नजरेतून पाहू नये अशी आशा आहे.  पंतप्रधानां समोर सांगितल्यामुळे आशा आहे की प्रक्रियेनुसार कारवाई होईल अशी खात्री आहे.

राज्यपालांच्या वक्तव्याबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिलं होतं. राष्ट्रपतींनी आधीच दखल घेतली आहे. आजही प्रक्रियेनुसार पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे, तसेच मोदींकडे आमची भूमिका पोहचली आहे, तसेच पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे.  असं उदयनराजे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी