ये रे, ये रे पावसा ..., जूनच्या मध्यातही पावसाने हुलकावणी दिल्याने आभाळाकडे नजरा

Weather Update: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मान्सून सक्रिय असून अधूनमधून पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत.

Look at the sky as there is no rain even in the middle of June
ये रे, ये रे पावसा ..., जूनच्या मध्यातही पावसाने हुलकावणी दिल्याने आभाळाकडे नजरा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पुढील पाच दिवसात राज्यभर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता
  • मुंबईसह कोकण पटट्यात २१ जूनपर्यंत अतिवृष्टीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
  • मुंबईत मान्सून सक्रिय असून अधूनमधून पाऊस पडत आहे.

पुणे :  महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी अद्याप पावसाला सुरुवात झाली नाही, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मान्सून सक्रिय असून अधूनमधून पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक भागात अद्यापही पेरण्यांना सुरुवात न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या आठवड्यात हंगामातील पहिला मुसळधार पाऊस झाला, तर सोमवारीही शहरात पाऊस झाला. येत्या पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने मंगवारी मुंबई आणि ठाण्यात २१ जूनपर्यंत अतिवृष्टीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर १९ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. (Look at the sky as there is no rain even in the middle of June)

अधिक वाचा :

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमताचा आकडा कुणाकडे ? भाजप की महाविकास आघाडी ?

मागील तीन आठवड्यापासून मान्सूनच्या पावसाने निराशा केली आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईत सक्रीय होऊन त्याने जोर धरला नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस दाखलच न झाल्याने शेती कामे खोळंबली आहे. तसेच कृषी विभागाने पेरणी करण्यासाठी वेट अॅन्ड वाॅचचा सल्ला दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अधिक वाचा :

Eknath Shinde: तीन महत्त्वाच्या 'जोर बैठका', एकनाथ शिंदेंचं बंड होणार का थंड?

मंगळवारी हवामानखात्याने आगामी पाच दिवसात राज्यभरात मान्सूनचा पाऊस सक्रिय होणार असल्याचा इशारा दिला. यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबईमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते रिमझिम पावसाची शक्यता वर्तवली आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी