धाराशिव/बीड : राज्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. एेन उन्हाळ्यात पडत असलेल्या पावसामुळे द्राक्षे, आंबा, टरबूज, संत्रा, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, धाराशीव जिल्ह्यात अवकाळी पावसाने काल अक्षरशः धुमाकूळ घातला येडशी, शिराढोण, तडवळा, वाडी आणि बामणी या भागात गारांचा पाऊस झाला आहे. (Loss due to unseasonal rain, loss to farmers)
अधिक वाचा : शरद पवार NDA मध्ये सहभागी होणार?, अयोध्येत पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिलं उत्तर
गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांना सतत कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. एप्रिल महिन्यात अवकाळी पावसासह गारपीटीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात चांगलाच पाऊस पडला. या पावसामुळे आंबा, ज्वारी, गहू, हरभरा, खरबुज, टरबुज, भाजीपाल्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाला आहे .अक्षरशः गारपिटीचा तडाखा बसला बसून होत्याच नव्हत झाल्याचे चित्र समोर येत आहे.
अधिक वाचा : Kiren Rijiju : केंद्रीयमंत्री किरेन रिजिजूंच्या कारला अपघात
बीड जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच अवकाळी पावसाने थैमान घातलं असून तालुक्यातील तिप्पट वाडी गावांमध्ये वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कनूर आणि बोरगाव या ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. तर, गहू, ज्वारी यासह आंब्याचा मोहर पूर्णपणे गळून गेला असून नव्याने लागवड केलेल्या भाजीपाल्याचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील विविध भागात जवळपास 15 जनावरे दगावली आहेत. मोठमोठ्या गारांनी कांदा चाळीवर असलेल्या पत्र्याची चाळण झाली. अनेक ठिकाणी गारपीटीमुळे बर्फाची चादर बीड जिल्ह्यात पाहायला मिळाली. शेतातील गहू, ज्वारी, आंबा, मोसंबी, पपई, टरबूज, भाजीपाला यासह विविध पिकं भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.
तळकोकणात सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, कोकम, जाभूळ पिकांना फटका बसला आहे. अवकाळी पाऊस पडल्याने जाभूळ गळून मातीमोल झाली आहेत.