जत्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याच्या सिलेंडरच्या स्फोटात चिमुरडीचा मृत्यू, चिमुरडीचे आजोबा गंभीर जखमी

Maharashtra Amravati girl died in the explosion of a gas balloon sellers cylinder in Jatra or Fair grandfather of the girl is seriously injured : जत्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी चिमुरडीचा मृत्यू झाला.

Maharashtra Amravati girl died in the explosion of a gas balloon sellers cylinder in Jatra or Fair grandfather of the girl is seriously injured
जत्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याच्या सिलेंडरच्या स्फोटात चिमुरडीचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जत्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याच्या सिलेंडरच्या स्फोटात चिमुरडीचा मृत्यू
  • चिमुरडीचे आजोबा गंभीर जखमी
  • आजोबांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

Maharashtra Amravati girl died in the explosion of a gas balloon sellers cylinder in Jatra or Fair grandfather of the girl is seriously injured : महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सिंधी बुजरूक गावात एक दुर्दैवी घटना घडली. गावात सुरू असलेल्या जत्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी चिमुरडीचा मृत्यू झाला. चिमुरडीच्या गंभीर जखमी असलेल्या आजोबांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

आकाशातून बघा भारत

ट्रेंड होत असलेले क्यूट फोटो

'या' सेलिब्रेटींच्या मृत्यूचं गूढ अद्यापही कायम

जत्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याने सिलेंडरमध्ये रसायन टाकले होते. या रसायनाचे प्रमाण चुकले. यामुळे गॅसने फुगे भरण्यासाठी तयार ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट झाला त्यावेळी एक चिमुरडी तिच्या आजोबांसोबत फुगा खरेदी करण्यासाठी आली होती. स्फोटात चिमुरडी आणि तिचे आजोबा असे दोघजण गंभीर जखमी झाले.

जखमी झालेल्या दोघांवर परतवाडातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना चिमुरडीने अखेरचा श्वास घेतला. 

स्फोट झाला त्यावेळी फुगेवाल्याने जिथे त्याचे दुकान थाटले होते त्या ठिकाणी चिमुरडी तिच्या आजोबांसह गेली होती. सिलेंडरमधील रसायनाचे प्रमाण बिघडल्यामुळे त्याचवेळी गॅसचे फुगे भरण्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात चिमुरडीने तिचा पाय गमावला पण ती जीवंत होती. चिमुरडीचे आजोबा गंभीर जखमी झाले.

पाय गमावल्यामुळे चिमुरडीची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी प्रयत्न केले. पण चिमुरडीला वाचविणे त्यांना शक्य झाले नाही. याआधी फुगेवाल्याने जिथे दुकान थाटले होते त्या ठिकाणी स्फोटाच्या दणक्याने सिलेंडर उडाला आणि स्लॅबवर आपटला. यामुळे स्लॅब तुटून खाली आला. आजोबा आणि त्यांच्या कडेवर असलेली चिमुरडी या दुर्घटनेत जखमी झाले. उपचार सुरू असताना हॉस्पिटलमध्ये चिमुरडीचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी