नागपूर : आजपासून राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) सुरू होणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. या अधिवेशनात महत्वाच्या विविध मुद्दयावरुन विरोधकांनी राज्य सरकारला (State Govt) घेरण्याची तयारी केली आहे. या प्रश्नांमुळे सरकारला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. तर आपल्या खासशैलीत सडेतोड उत्तर देत सरकार अधिवेशनाचे तापमान वाढवण्याचा प्रयत्न करणार. (winter session of state government in nagpur from today)
अधिक वाचा : Daily Horoscope: कसा असेल सोमवारचा दिवस, जाणून घ्या
या अधिवेशनात राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तसेच सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक आज सरकारला घेरण्याची शक्यता असून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : फीफा विश्वकपाच्या विजयानंतर मेस्सीचं मन बदललं
आक्रमक असलेल्या विरोधकांपुढे राज्य सरकारची कसोटी लागणार आहे. काल रविवारी राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकत विरोधकांनी आपल्या आक्रमक पवित्र्याची प्रचिती आणून दिली. अजित पवारांसारखा विरोधी पक्ष नेता आणि सोबतीला राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेससारखे तगडे विरोधक समोर असणार आहेत. विशेष म्हणजे या अधिवेशनात नागपुरात (Nagpur)पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, विरोधकांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या टोमण्यांना सडेतोड उत्तर देण्याची तयारी
सरकारने केली आहे.
अधिक वाचा : Love Marriage नंतर पतीनं कटर मशीननं पत्नीचे केले अनेक तुकडे
1. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विधेयक
2. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न सुधारणा विधेयक
3. मुंबई पालिका विधेयक, इमारतीच्या किंवा जमिनीच्या भांडवली मुल्यात सुधारणा करणेबाबत
4. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक
5. नवीन स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याबाबत विधेयक
6. महाराष्ट्र पोलीस व महाराष्ट्र सिनेमा सुधारणा विधेयक
7. महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक विधेयक
8. युनिवर्सल ए.आय. विद्यापीठ, पुणे विधेयक
9. पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे विधेयक
10. महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक
11. उल्हासनगरातील अनधिकृत विकासकामं नियमाधीन करणं