Maharashtra Heatstroke Death Case : उष्माघाताच्या मृत्यू प्रकरणी अजित पवारांचा गंभीर आरोप

Maharashtra Bhushan Award Ceremony, Ajit Pawar serious allegation in the heatstroke death case : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 झाली आहे.

Maharashtra Bhushan Award Ceremony, Ajit Pawar serious allegation in the heatstroke death case
उष्माघाताच्या मृत्यू प्रकरणी अजित पवारांचा गंभीर आरोप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • उष्माघाताच्या मृत्यू प्रकरणी अजित पवारांचा गंभीर आरोप
  • मृत्यू झालेल्यांची संख्या 12 झाली
  • विरोधक आक्रमक झाले

Maharashtra Bhushan Award Ceremony, Ajit Pawar serious allegation in the heatstroke death case : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 झाली आहे. या घटनेवरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने पुरस्कार वितरणाचा सोहळा संध्याकाळी का घेतला नाही? अशा स्वरुपाचा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवार 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबई येथील खारघर येथे पार पडला. याप्रसंगी चार ते पाच तास उन्हात बसल्याने बारा श्री सदस्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारला जाब विचारला आहे.

कार्यक्रम सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत झाला. कार्यक्रम झाला त्यावेळी तापमान 37 अंश सेल्सिअस होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गर्दीच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याची सोय आणि वैद्यकीय मदत केंद्र ही व्यवस्था अपुरी होती. अफाट गर्दी, प्रचंड उकाडा यामुळे नागरिकांना त्रास झाला. रणरणत्या उन्हात डोक्यावर छप्पर नसताना तासनतास बसून राहिल्यामुळे बारा जणांचा मृत्यू झाला. 

उष्माघातामुळे सरकारी कार्यक्रमात बारा जणांचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आग्रहामुळे कार्यक्रम सकाळी करण्याचा निर्णय झाला, असा आरोप महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. उष्माघाताचा त्रास नेमका किती जणांना झाला, किती जणांचा मृत्यू झाला या संदर्भातील आकडेवारी जाहीर करताना लपवाछपवी केली जात आहे, असाही आरोप अजित पवार यांनी केला. उन्हाळा सुरू आहे त्यामुळे कार्यक्रम सकाळ ऐवजी संध्याकाळी घेतला असता तरी चालले असते, असेही विरोधक म्हणाले.

उष्माघाताच्या मृत्यू प्रकरणी काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी महाराष्ट्र शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मृतांची संख्या झाली बारा

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 झाली आहे. आधी 11 जणांचा मृत्यू झाला होता.

अभिनेत्रीच्या लग्नाची गोष्ट

छान किती दिसती साराच्या या अदा

खारघर येथील कार्यक्रमावेळी उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे 12 मृत्यू झाले. यापैकी 11 जणांची ओळख पटविण्यात आली आहे. एकूण 11 पैकी दहा मृतदेह वारसांच्या ताब्यात देण्यात आले असून एक मृतदेह  बेवारस असून महिलेचा आहे वारसाचा शोध चालू आहे

  1. महेश नारायण गायकर (42, रा. वडाळा मुंबई आणि मूळ गाव म्हसळा मेहंदडी)
  2. जयश्री जगन्नाथ पाटील (54, रा. म्हसळा रायगड)
  3. मंजुषा कृष्णा भोंबंडे (51, रा. गिरगाव मुंबई आणि मूळ गाव श्रीवर्धन)
  4. स्वप्निल सदाशिव केणी (30, रा. शिरसाटबामन पाडा विरार)
  5. तुळशीराम भाऊ वांगड (58, रा. जव्हार पालघर)
  6. कलावती सिद्धराम वायचळ (46, रा. सोलापूर)
  7. भीमा कृष्णा साळवी (58, रा. कळवा ठाणे)
  8. सविता संजय पवार (42, रा. मुंबई)
  9. पुष्पा मदन गायकर (64, रा. कळवा ठाणे)
  10. वंदना जगन्नाथ पाटील (62, रा. करंजाडे)
  11. एक अनोळखी महिला (50 ते 55)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी