SSC Exam 2022: दहावीच्या विद्यार्थ्यांना लागली सुट्टी, आता निकालाची प्रतिक्षा 

SSC Exam 2022 : महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आज झाला. लेक्चर ऑनलाइन झाल्यामुळे परीक्षा देखील ऑनलाइन व्हाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. पण कोरोनाची दुसरी लाट आणि त्यानंतर ओमिक्रॉनची तिसरी लाट कमी झाल्यानंतर ऑफलाइन माध्यमातून या परीक्षा घेण्यात आल्या.

maharashtra board ssc exam the 10th standard exam done smoothly Education news in marathi
SSC Exam 2022: दहावीच्या विद्यार्थ्यांना लागली सुट्टी 
थोडं पण कामाचं
  • दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर होता आज
  • कोरोना काळात बोर्डासमोर परीक्षेचे होते मोठे आव्हान
  • ऑफलाइन परीक्षेला विद्यार्थ्यांकडून होता विरोध, ऑनलाइनची केली होती मागणी 

Maharashtra Board SSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणारी दहावीची परीक्षा (SSC Exam) सुरळीतपणे पार पडली. दहावीची परीक्षा २०२२ ही १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. कोरोनामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातील ऑफलाइन शिक्षण प्रक्रिया ठप्प झाली होती. प्रत्यक्षात वर्ग न भरता आँनलाईन पध्दतीने (Online Exam) शिक्षण देणे सुरु होते. गेल्या वर्षी परीक्षा मंडळाने कोरोनामुळे परीक्षा (SSC Result 2022) घेतल्या नव्हत्या. यावर्षीही परीक्षा घेण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर होते.  कोरोनाची दुसरी लाट नंतर ओमिक्रॉनच्या माध्यमातून तिसरी लाटेचे संकट आले होते. त्यानंतर विद्यार्थी आणि पालक धास्तावले होते.  परीक्षा न घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले.  यामुळे या परीक्षा सुरळीतपणे पार पडतात की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.  दहावीची परीक्षा सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये सकाळी १०.३० वाजल्यापासून  परीक्षा सुरू होती. उर्वरित पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ वाजल्यापासून घेण्यात आले. (maharashtra board ssc exam the 10th standard exam done smoothly Education news in marathi )

या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी आपले नाव रजिस्टर केले होते. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनी परीक्षा दिली. एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. संपूर्ण राज्यातील ५०५० मुख्य केंद्र आणि १६ हजार ३३४ उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेतून नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच विभागीय स्तरावर एक किंवा दोन समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती. दहावीची परीक्षा देणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना सवलत देण्यात आली.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले होते. एकूण २१,३४९ इतक्या परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांवर परीक्षा घेतली गेली. 

शिक्षक आणि अधिकाऱ्याच्या सुचनांनुसार प्रथमच ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करावी अशी सुचना करण्यात आली. काम आव्हानात्मक होते. गैरप्रकार होतील. परीक्षा सुरळीतपणे पार पडणार नाहीत, काँपीचे प्रमाण वाढेल, परीक्षेची विश्वासार्हता संपुष्टात येईल अशी आवई उठवण्यात आली. विद्यार्थ्यांना हाताशी धरून राज्यात आंदोलन करण्यात आले. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाने राज्यातील दहावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडली. गैरप्रकारांना आळा बसला. शिक्षक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापकांनीही विश्वासार्हता जपल्याची माहिती देण्यात आली.

शिक्षण विभागाचे भरारी पथक, शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अधिकारी वर्ग व मुख्यध्यापक या सर्वांनीच परीक्षा काळात जबाबदारीने उल्लेखनीय कामगिरी केली. याचे फलीत म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आपल्या शिक्षण विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समन्वयाने कोरोनाकाळातील कठीण परीक्षा पार पाडली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी