Maharashtra News: नवी दिल्ली : पंजाबनंतर (Punjab) आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात भूकंप घडत काही तर उलपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाराजी सत्रामुळे काँग्रेस (Congress) हायकमांडला चिंता लागली असून राज्यातील ज्येष्ठ नेत्यांविषयी पक्ष अध्यक्ष (President) सोनिया गांधी (Sonia Gandhi) का निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी या आमदारांनी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या ज्येष्ठ मंत्र्यांविरोधात तक्रार केल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींसोबत सुमारे 35 मिनिटे चाललेल्या या बैठकीत 22 आमदारांच्या शिष्टमंडळाने काँग्रेस विधिमंडळ पक्षात समन्वयाचा अभाव आणि आमदारांसाठी विकासकामांसाठी राखून ठेवलेला सरकारी निधी न मिळणे यासारखे मुद्दे उपस्थित केले आहेत. बैठकीत विकास ठाकरे, कुणाल पाटील, संग्राम थोपटे यांच्यासह आमदारांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपापल्या पक्षांच्या आमदारांना प्रभावीपणे मदत केली, तर काँग्रेसच्या आमदारांकडे विधानसभेत दुर्लक्ष करण्यात आले.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे युतीचे सरकार आहे. सोनिया गांधी यांनीही महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीला होत असलेल्या विलंबावर चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे. विविध राज्य महामंडळांमधील नियुक्त्यांचा मुद्दाही आमदारांनी उपस्थित केला आणि तीन आघाडीच्या भागीदारांच्या सहभागासाठी पारदर्शक प्रक्रिया असावी असंही या आमदरांनी म्हटलंय. या बैठकीत सोनिया गांधी यांनी आमदारांना त्यांच्या तक्रारी लेखी देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालू आहे. ज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश असून, सर्व पक्षांच्या समन्वयानेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. 2019 पासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहे.