Maharashtra Cabinet Expansion: आज 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार, कोण होणार मंत्री? ; वाचा येथे 'त्या' 18 जणांची नावं

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 09, 2022 | 08:37 IST

Shinde-Fadnavis government swearing in today: आज अखेर राज्य मंत्रिमंडळाचा (State Cabinet) विस्तार होणार आहे. गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला विस्तार आज 11 वाजता राजभवन येथे होत आहे.

cabinet expansion
राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज 
थोडं पण कामाचं
 • गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला विस्तार आज 11 वाजता राजभवन येथे होत आहे.
 • राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील.
 • राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.

मुंबई: Maharashtra Cabinet Expansion 2022 Today: आज अखेर राज्य मंत्रिमंडळाचा (State Cabinet)  विस्तार होणार आहे. गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला विस्तार आज 11 वाजता राजभवन येथे होत आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. शपथविधी समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) , विधानसभेचे विरोधी पक्षनेते  अजित पवार आदींना निमंत्रण देण्यात आले आहे.  यावेळी भाजपचे आणि शिंदे सेनेचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

जून महिन्यात राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. 

अधिक वाचा-  Sanjay Raut : संजय राऊतांना २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी

शिंदे गटातील हे मंत्री शपथ घेतील

 • उदय सामंत
 • दादा भुसे
 • संजय शिरसाठ
 • संदीपान भुमरे
 • गुलाबराव पाटील
 • भरत गोगावले 
 • शंभूराज देसाई


भाजपकडून हे मंत्री शपथ घेतील

 • चंद्रकांत दादा पाटील
 • राधा कृष्ण विखे पाटील
 • सुधीर मुनंगटीवार
 • गिरिश महाजन
 • सुरेश खाडे, मिरज
 • अतुल सावे
 • मंगल प्रभात लोढा 
 • रवींद्र चव्हाण
 • विजयकुमार गावित
 • गणेश नाईक
 • चंद्रशेखर बावनकुळे 

कोणत्या खात्याचं होणार वाटप

शिंदे गटाकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, उद्योग, कृषी ही खाती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भाजपकडे गृह, वित्त, महसूल, सार्वजनिक बांधकाम ही खाती जाऊ शकतात. विस्तारानंतर संध्याकाळी खातेवाटप जाहीर करण्यात येईल. गृह आणि वित्त ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहतील, असं म्हटलं जात आहेत. शालेय शिक्षण, ग्रामविकास, आदिवासी विकास हे भाजपकडे तर उच्च शिक्षण शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. तर जलसंपदा शिंदे गटाकडे तर महसूल खातं भाजपकडे येऊ शकतं. 

राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे.  विधीमंडळ सचिवालयाकडून याबाबत परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर देखील विधिमंडळात काल अधिकाऱ्यांची तातडीच बैठक बोलावण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी