Gram Panchayat Election Result: निवडणूक निकालाचा धुरळा, राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आज मतमोजणी

गावगाडा
Pooja Vichare
Updated Sep 19, 2022 | 08:28 IST

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. काल ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022
राज्यातील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज मतमोजणी! 
थोडं पण कामाचं
 • रविवारी शांततेत सगळीकडे मतदान प्रक्रिया पार पडली होती.
 • राज्य निवडणूक आयोगाकडून 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 12 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.
 • काल प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले.

मुंबई: Maharashtra Gram Panchayat Election Results 2022: राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) निवडणुकीसाठी (election) मतदान रविवारी पार पडले. या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी आज (Gram Panchayat Election Results 2022)  होणार आहे.  प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. काल ग्रामपंचायत सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.  दुपारपर्यंत सर्व जागांवरील चित्र स्पष्ट होईल. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. 

रविवारी शांततेत सगळीकडे मतदान प्रक्रिया पार पडली होती.  राज्य निवडणूक आयोगाकडून 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 12 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे काल प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी संध्याकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.  

अधिक वाचा-  आधी आदित्य, मग उद्धव आणि आता रश्मी ठाकरेंवर रामदास कदमांचा थेट निशाणा

जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाली याची आकडेवारी खालीलप्रमाणे 

 • पुणे जिल्हा

जुन्नर 38, आंबेगाव 18,  खेड 5, भोर 2

 • अहमदनगर जिल्हा 

अकोले 45 

 • लातूर जिल्हा 

अहमदपूर 1

 • सातारा जिल्हा

वाई 1, सातारा 8

 • कोल्हापूर जिल्हा 

कागल 1

 • नाशिक जिल्हा

कळवण 22, दिंडोरी 50, नाशिक 17

 • हिंगोली जिल्हा 

औंढा नागनाथ 6
 

 • परभणी जिल्हा

जिंतूर 1, पालम 5

 • नांदेड जिल्हा

माहूर 24, किनवट 47, अर्धापूर 1, मुदखेड 3, नायगाव खैरगाव 4, लोहा 5, कंधार 4, मुखेड 5, देगलूर 1, 

 • धुळे जिल्हा

शिरपूर 33

 • नंदुरबार जिल्हा

शहादा 74 आणि नंदुरबार 75

 • जळगाव जिल्हा 

चोपडा 11 आणि यावल 02

 • बुलढाणा जिल्हा

जळगाव जामोद – 1, संग्रामपूर 1, नांदुरा 1, चिखली 3, लोणार 2

 • अकोला जिल्हा

अकोट 5, बाळापूर 1

 • वाशिम जिल्हा

कारंजा 04

 • अमरावती जिल्हा

धारमी 1, तिवसा 4, अमरावती 1, चांदूर रेल्वे 1,

 • यवतमाळ जिल्हा

बाभुळगाव 2, कळंब 2, यवतमाळ 3, महागाव 1, आर्णी 4, घाटंजी 6, केळापूर 25, राळेगाव 11, मोरेगाव 11, झरी जामणी 8

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी