Gram Panchayat Election: मुंडे भाऊ-बहिणीने करून दाखवलं! एकत्र पॅनल लढवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं

Maharashtra Gram Panchayat Election: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी एकत्र पॅनल करुन ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. या निवडणुकीची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

Maharashtra Gram Panchayat Election 2022 result pankaja munde and dhananjay munde pannel wins in nathara gram panchayat beed read details in marathi
Gram Panchayat Election: मुंडे भाऊ-बहिणीने करून दाखवलं! एकत्र पॅनल लढवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं 
थोडं पण कामाचं
  • नाथरा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय मुंडे विजयी
  • धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे सरपंचपदी विराजमान
  • धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीच्या एकत्र पॅनलच्या विजयाची होतेय जोरदार चर्चा

Beed Gram Panchayat Election Result: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे चुलत भाऊ-बहीण असले तरी दोघांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, असे असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीत एक वेगळेच चित्र पहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील मुंडेंचे मूळगाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र पॅनल लढवण्याचा निर्णय घेतला. अखेर या निर्णयामुळे गावच्या सरपंचपदी अभय मुंडे हे विराजमान झाले आहेत. (Maharashtra Gram Panchayat Election 2022 result pankaja munde and dhananjay munde pannel wins in nathara gram panchayat beed read details in marathi)

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीने एकत्र यावे अशी इच्छा दोघांच्या समर्थकांची आहे. ही इच्छा नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकप्रकारे पूर्ण झाली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील नाथरा हे गाव पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे मूळगाव आहे. या गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र बसून चर्चा केली अन् ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.

हे पण वाचा : अंघोळीपूर्वी करा बॉडी मसाज होतील असंख्य फायदे

निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे यांना सरपंचपदासाठी धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी पाठिंबा दिला. या पाठिंब्याचे पोस्टर्सही बीडमध्ये लागले. एकमेकांवर राजकीय टीका करणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच बॅनरवर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. अखेर नाथरा ग्रामपंचायतीत अभय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला.

हे पण वाचा : या कारणांमुळे तुमचे वजन कमी होत नाही

परळी आणि बीड जिल्ह्यात आमचीच सरशी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं, "बीड जिल्ह्यातील सुजान नागरिकांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त भाजप पुरस्कृत उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्वांचे आभार."

"तसेच ग्रामपंचायत निवडणूक निकालात विजय संपादित केलेल्या सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी