Maharashtra Weather Update: पहाटेपासूनच पावसाचं थैमान; पुढील 3 ते 4 तास मुंबई ठाणेकरांना सतर्कतेचा इशारा

गावगाडा
Pooja Vichare
Updated Sep 16, 2022 | 11:05 IST

Mumbai, Thane Weather Updates:हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा (heavy rain) इशारा देण्यात आला आहे.

Weather Update
Alert..! पुढील 3 ते 4 मुंबई ठाण्यात तुफान पावसाचा इशारा 
थोडं पण कामाचं
  • मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा (heavy rain) इशारा देण्यात आला आहे.
  • पहाटेपासून मुंबईसह ठाण्यात अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
  • मुंबईमधील अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ, पवई आणि खारमध्ये सकाळपासूनच मुसळधार सरी बरसत आहेत.

मुंबई: Maharashtra Rain Updates: राज्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई, (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात पावसानं थैमानं घातलं आहे.  हवामान विभागानं  (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा (heavy rain) इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजेच दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

मुंबईत (Mumbai) देखील जोरदार पाऊस सुरु आहे.  पहाटेपासून मुंबईसह ठाण्यात अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. मुंबईमधील अंधेरी, गोरेगाव, सांताक्रुझ, पवई आणि खारमध्ये सकाळपासूनच मुसळधार सरी बरसत आहेत. दिवसभरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

अधिक वाचा-  IRCTC Railway Train:आजही अनेक गाड्या रद्द; अनेक ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

होसाळीकर यांनी दिला अंदाज 

हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात ट्विट करताना पुढील तीन ते चार तास मुंबई आणि ठाण्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. 

मुंबईकर आणि ठाणेकरांनी आज प्रवास करताना काळजी घ्यावी. पुढील तीन ते चार तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. सकाळी 9 वाजताच्या रडारवरील हवामानाच्या अंदाजानुसार मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील 24 तासात जोरदार पाऊस पडल्याचं दिसत आहे. पुढील 48 तास (दोन दिवस) मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याचं होसाळीकर यांनी सांगितलं आहे. 

मुंबई ठाण्यातल्या पावसाची परिस्थिती 

सकाळपासूनच मुंबईसह ठाणे परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर सकाळपासून पावसाचा जोर आणखीन वाढला आहे. आता पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवल्यानं मुंबईकरांनी सतर्क राहावं अशी सूचना दिली आहे. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक मंद गतीनं सुरु आहे. दरम्यान मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. 

पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी  जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता  हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरसह काही भागांतही हलक्या सरी कोसळल्या. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि विदर्भात अकोला अमरावतीत हलक्या सरींची नोंद करण्यात आली आहे. 

पुढील एक ते दोन दिवस पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात काही दिवस राज्यात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटात हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18, 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी