Raigad: रायगडमध्ये दोन संशयास्पद बोट आढळल्या; बोटीत शस्त्रसाठा असल्याने खळबळ, संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट

Suspicious boat found in Raigad: रायगड जिल्ह्यात दोन संशयास्पद बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Breaking News
Raigad: रायगडमध्ये संशयास्पद संशसायस्पद बोट आढळली; बोटीत शस्त्रसाठा असल्याने खळबळ, संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न?
  • संशयास्पद बोट आढल्यालनंतर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून अलर्ट
  • एका बोटीवर एके ४७ रायफल आढळून आल्याची प्राथमिक माहिती

Suspicious boat found in Raigad: रायगड जिल्ह्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळून आली आहे. संशयास्पद बोटीवर काही शस्त्रसाठाही आढळून आला आहे. पोलीस गस्त घालत असाताना ही संशयास्पद बोट आढळून आली. बोटीवर शस्त्रसाठाही आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशयास्पद बोट आढल्यालनंतर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (Suspicious boat found Harihareshwar in Raigad district of Maharashtra)

हरिहरेश्वर आणि भरडखोल समुद्र किनाऱ्यावर दोन संशयास्पद बोट आढळून आल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांकडून हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे. 

रायगडमध्ये दोन संशयास्पद बोट आढळून आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी एका बोटीमध्ये ३ एके ४७, जिवंत काडतूससह इतरही काही शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात अशा प्रकारे संशयास्पद आणि शस्त्रसाठा बोटीवर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र एटीएसची टीम रायगडला रवाना झाली आहे.

अधिक वाचा : Suspicious boat in Raigad: हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या बोटीचं ओमान कनेक्शन? मोठी माहिती आली समोर

रायगडच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, हरिहरेश्वर किनारी एक अनोळखी बोट लागली असून मौजे भरडखोल किनाऱ्यावर एक लाईफबोट आली आहे. दोन्ही बोटीमध्ये कोणीही व्यक्ती आढळून आलेल्या नाहीत. कोस्ट गार्ड व MMB यांना याबाबत सूचना देण्यात आलेली आहे. पोलीस विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर बोट आढळून आली आहे. या बोटीवर तीन एके ४७ आणि जवळपास २५० जिवंत काडतुसे आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच दिवे आगार येथेही एक बोट आढळली असून त्या बोटीवर खाण्याचे साहित्य, पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

दोन संशयास्पद बोट आढळून आल्या आहेत. या बोटीवर एके ४७, काही कागदपत्रे आढळून आली आहेत. या घटने प्रकरणी रायगड पोलीस तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणात महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करावा अशी मागणी आमदार अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी