Accident News : कारच्या धडकेने तरुणी 12 फूट उडून खाली पडली, अपघाती मृत्यू

maharashtra hingoli 19 year old girl dies while running practice for police recruitment test after car hit : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर एक विचित्र अपघात झाला. पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीला कारने पाठीमागून धडक दिली.

Accident News
कारच्या धडकेने तरुणी 12 फूट उडून खाली पडली, अपघाती मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कारच्या धडकेने तरुणी 12 फूट उडून खाली पडली, अपघाती मृत्यू
  • पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीचा अपघाती मृत्यू
  • पोलीस तपास सुरू

maharashtra hingoli 19 year old girl dies while running practice for police recruitment test after car hit : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर एक विचित्र अपघात झाला. पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या 19 वर्षांच्या तरुणीला कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये तरुणी 12 फूट उंच उडून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार 2 मार्च 2023) सकाळी 6 वाजता घडली. 

अपघातात कन्याकुमारी कृष्णा भोसले या 19 वर्षांच्या तरुणीचा घटनास्थळी मृत्यू झाला. कन्याकुमारी ही वसमत तालुक्यातील आंबा गावातील रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कन्याकुमारी धावण्याचा सराव करत होती. तिच्या सोबत आणखी 2 जणी होत्या. पण त्या थोड्या पुढे होत्या. यामुळे कारची धडक एकट्या कन्याकुमारीला बसली. पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला जोरदार धडक दिली.

झोपण्याआधी पाणी पिणे योग्य की अयोग्य?

चाणक्य निती : पत्नी पतीपासून या गोष्टी लपवून ठेवते

घरातल्या झुरळांचा बंदोबस्त करण्याचे सोपे प्रभावी उपाय

कारची जोरदार धडक बसल्यामुळे कन्याकुमारी ही 19 वर्षांची तरुणी 12 फूट उंच उडून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे कन्याकुमारीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालकाने नेमके काय घडले हे लक्षात येताच घटनास्थळावरून पलायन केले. एका शेतकऱ्याने आणि कन्याकुमारीसोबत धावण्याचा सराव करत असलेल्या दोघींनी अपघात झाल्याचे बघून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने कन्याकुमारीचा मृतदेह वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी