सीमाप्रश्नी शिंदे सरकारचे पाऊल पडते मागे; मंत्र्यांचा आजचा बेळगाव दौरा अखेर रद्द

गावगाडा
भरत जाधव
Updated Dec 06, 2022 | 09:23 IST

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. जो काही निर्णय घेणार आहे ते न्यायालय घेणार आहे. मंत्र्यांना कर्नाटकात जायचे तर ते जाऊ शकतात. त्यांना कुणी रोखू शकणार नाही. मात्र दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. अशा वेळी कोणताही गोंधळ, वाद होणे उचित होणार नाही. काय करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला सांगतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Today's Belgaum visit of the minister is finally cancelled
सीमाप्रश्नी शिंदे सरकारचे पाऊल पडते मागे  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची या समन्वयक मंत्री म्हणून निवड
  • चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना 3 डिसेंबरला बेळगाव भेटीचे निमंत्रण महाराष्ट्र एकीकरण समितीने दिले होते.
  • दौऱ्याची ही योग्य वेळ नाही. सीमावाद हा न्यायप्रविष्ट असल्याने तो न्यायालयात सनदशीर मार्गाने त्या उपाय काढावा- कर्नाटक मुख्यमंत्री

मुंबई :  महाराष्ट्र - कर्नाटक ( Maharashtra-Karnataka) सीमा वाद (border dispute) दोन्ही राज्यात पेटला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील गावांवर आपला हक्का सांगितल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात पंढरपूर, नांदेड, नाशिक, सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी महाराष्ट्र सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार मात्र एक-एक पाऊल मागे येताना दिसत आहे. सीमाप्रश्न मार्ग काढण्यासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या मंत्र्याचा दौरा आज रद्द करण्यात आला आहे. (Maharashtra-Karnataka border dispute; Today's Belgaum visit of the minister is finally cancelled) 

अधिक वाचा  : तुमच्या खिशातील 500 रुपयांची नोट नकली तर नाहीये ना?अशी तपासा

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची या समन्वयक मंत्री म्हणून निवड करत आली होती.  आज मंगळवार, 6 डिसेंबर रोजी त्यांचा होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी काही गोंधळ, वादविवाद नको म्हणून दौरा टाळण्यात आल्याचे सांगून या विषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतिम निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले.

अधिक वाचा  :  महाविकास आघाडीकडून महामोर्चाची हाक, 17 डिसेंबरला महामोर्चा

दमरम्यान, चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना 3 डिसेंबरला बेळगाव भेटीचे निमंत्रण महाराष्ट्र एकीकरण समितीने दिले होते. मात्र ३ डिसेंबरला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील बेळगावमध्ये होते. अशा वेळी महाराष्ट्राचे मंत्रीही तेथे आल्यास तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि मुख्य सचिवांनी ही तारीख टाळण्याची विनंती केली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी हा दौरा 6 डिसेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता.

अधिक वाचा  :गुजरातमध्ये मोदी लाट कायम; काँग्रेसला झटका तर आपचा सुपडा साफ

दरम्यान, महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. जो काही निर्णय घेणार आहे ते न्यायालय घेणार आहे. मंत्र्यांना कर्नाटकात जायचे तर ते जाऊ शकतात. त्यांना कुणी रोखू शकणार नाही. मात्र दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते. अशा वेळी कोणताही गोंधळ, वाद होणे उचित होणार नाही. काय करायचे याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आम्हाला सांगतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न -बोम्मई महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावचा दौरा केल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे दौऱ्याची ही योग्य वेळ नाही. सीमावाद हा न्यायप्रविष्ट असल्याने तो न्यायालयात सनदशीर मार्गानेच लढावा, असे आवाहन सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी