गोंदिया: Maharashtra Gondia train accident: एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात एका ट्रेनचा मोठा (Train Accident) अपघात झाला आहे. राज्यातल्या गोंदियामधून (Gondia)ही रेल्वे अपघाताची घटना समोर येत आहे. येथे एका पॅसेंजर ट्रेनने मालगाडीला धडक दिली. या अपघातात पॅसेंजर ट्रेनचा एक (Passenger Train Derailed) डब्बा रुळावरून घसरला.
या अपघातात 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Maharashtra | More than 50 persons were injured after 3 bogies of a train derailed in Gondia around 2.30 am at night. A collision b/w a goods train & passenger train led to this accident. No deaths reported. Train was on its way from Bilaspur, Chhattisgarh to Rajasthan's Jodhpur pic.twitter.com/Fxzmdbvhw8 — ANI (@ANI) August 17, 2022
अधिक वाचा- Maharashtra Monsoon Session : शिंदे सरकारचं आज पहिलं अधिवेशन, सत्ताधारी आणि विरोधक खडाजंगी होणार
दरम्यान जखमी प्रवाशांची (Injured passengers) प्रकृती गंभीर नसल्याचं सांगण्यात येत आहे. रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या भगत की कोठी (Bhagat Ki Kothi) ट्रेनला गोंदिया शहराजवळ अपघात झाल्याचं समजतंय.
#BreakingNow: महाराष्ट्र के गोंदिया में ट्रेन हादसा, पैसेंजर ट्रेन और माल गाड़ी के बीच हुई टक्कर में 50 से ज्यादा यात्री घायल@AnchorAnurag @Aruneel_S #Gondia #Maharashtra pic.twitter.com/jAlBwntHns — Times Now Navbharat (@TNNavbharat) August 17, 2022
समोरून जात असलेल्या मालगाडीला भगत की कोठी ट्रेनने मागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रायपूरहून (Raipur) पॅसेंजर ट्रेन नागपूरला (Nagpur) जात होती.
वृत्तसंस्था ANI च्या वृत्तानुसार, या अपघातात ट्रेनच्या तीन डब्बे रुळावरून घसरले. सिग्नल बिघडल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 53 लोक किरकोळ जखमी तर 13 जणांना थोडा मार लागला आहे. या अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही आहे.