Maharashtra Rain: आजपासून पुढचे दोन दिवस राज्यातल्या 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा, Yellow Alert जारी

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 31, 2022 | 10:07 IST

Maharashtra Rain updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. राज्यात पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. मात्र राज्यातल्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे.

Maharashtra Rain
महाराष्ट्रातील पावसाचे स्थिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे.
  • राज्यात पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. काही जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
  • मुंबईसह ठाण्यात (Mumbai and Thane) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

मुंबई: Maharashtra Rain Live Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. राज्यात पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. मात्र राज्यातल्या काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाण्यात (Mumbai and Thane) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या पावसाचे (rain updates in Maharashtra) अपडेट्स. 

सोलापूर जिल्ह्यातल्या ही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. दरम्यान आजपासून पुढील दोन दिवस कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं यासंदर्भातली माहिती दिली आहे. 

अधिक वाचा- दिवसभर गरम पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते का?, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी 

राज्यातल्या काही जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबईत कसा आहे पाऊस 

मुंबई आणि ठाण्यात मंगळवारपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सध्या मुंबई ठाण्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागानं म्हटलं आहे की, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल. 

गणेशोत्सवात राज्यात कशी असेल पावसाची स्थिती?

1 सप्टेंबरपासून राज्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 1 सप्टेंबरपासून राज्यात पावासाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं आवाहन केलं आहे की, 1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं.  येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याकाळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी