Maharashtra Rain:आजही मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना दिला Yellow Alert

गावगाडा
Pooja Vichare
Updated Sep 18, 2022 | 08:05 IST

Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून पावसानं राज्यातल्या विविध भागात थैमान घातलं आहे. राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) चांगलीच हजेरी लावली आहे.

maharashtra-rain
राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.  
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात पावसानं थैमान घातलं आहे.
  • हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे.
  • पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

मुंबई: Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या विविध भागात पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासांत  मुंबईसह उपनगरात पावसाने (heavy rainfall) जोरदार हजेरी लावली.  दरम्यान हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे.  पुण्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून खडकवासलासह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.   यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात पावसाचा जोर कायम आहे.  आज देखील हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

आजही राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. सकाळपासून देखील मुंबई आणि परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे. तसेच राज्यातील पालघर, अकोला, भिवंडी पुणे या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. तसेच सातारा जिल्ह्यातील कोयनेतूनही पाण्याच विसर्ग वाढवण्यात आला आहे.

अधिक वाचा-  काय मुंबईकर फिरायला जाताय? मग एकदा बघा रेल्वेचं वेळापत्रक; मध्य आणि ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक

दरम्यान आज विदर्भासह मराठवाड्यात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, लातूर बीड या जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अहमदनगर, जळगाव जिल्ह्याला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळं धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. मध्यरात्री मुंबईत जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई, पालघर परिसरात देखील जोरदार पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला या जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार पाऊस झाला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोकणातील अनेक भागात पाऊस सुरूच आहे. आज हवामान विभागान रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी