Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा 5 दिवस धो-धो, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला काढणार झोडपून

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 06, 2022 | 11:43 IST

Maharashtra Rains:पावसानं राज्याच्या विविध भागात पुनरागमन केलं आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Maharashtra Rain update
राज्यातील पावसाचे अपडेट्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
  • पावसानं राज्याच्या विविध भागात पुनरागमन केलं आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
  • मुंबई, ठाणे परिसरासह राज्यातल्या नांदेड, नाशिक, लातूर (Mumbai, Thane, Nanded, Nashik, Latur)आणि अहमदनगर (Ahmednagar) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे.

मुंबई: Maharashtra Heavy Rain Update: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसानं राज्याच्या विविध भागात पुनरागमन केलं आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोकण (Konkan) सह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील नद्या अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यात आहे. पावसाची सद्यस्थिती पाहिली असता मुंबई, ठाणे परिसरासह राज्यातल्या नांदेड, नाशिक, लातूर (Mumbai, Thane, Nanded, Nashik, Latur)आणि अहमदनगर (Ahmednagar) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. 

पुढील चार दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. पुढील पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अधिक वाचा- पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊत यांच्या पत्नीचा काय संबंध?, आज वर्षा राऊतांची ED चौकशी

राज्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा दिल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 

तळकोकणात मुसळधार पाऊस 

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं दडी मारली होती. आता काही दिवसांच्या ब्रेकनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं पुन्हा एकदा एन्ट्री घेतली आहे. सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. याकाळात दोन दिवस ऑरेंज अलर्ट आणि दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. 

बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळेच राज्यात पाऊस वाढणार आहे. तर गेले 10- 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजा देखील चिंतेत पडला होता. मात्र आता हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्यानं बळीराजा देखील निश्चिंत झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी