Maharashtra Rain Update: आज राज्यातल्या 'या' भागात रेड अलर्ट... तर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 08, 2022 | 08:51 IST

Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय.

Mumbai Rain
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे.
  • मुंबईतही धो-धो पाऊस कोसळत आहे.
  • मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई: Maharashtra Rain Update: राज्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय. मुंबईतही धो-धो पाऊस कोसळत आहे.  राज्यात पुढच्या चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे.

दुसरीकडे मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ते म्हणजे मुंबईकरांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी फक्त 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळे व्यतिरिक्त समुद्रकिनारी कुणीही फिरू नये, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

अधिक वाचा-  बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल, फोनवर धक्कादायक खुलासे; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

आज या भागात रेड अलर्ट 

राज्यातल्या विविध भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसानं जोर धरला आहे.  कालपासून तीन दिवस राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.


 
मुंबईच्या पावसाचे अपडेट्स 

मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.  मुंबईत यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून तब्बल 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारी म्हणून मोठा निर्णय घेतला आहे.  रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असणार आहे. त्यानंतर समुद्रावर जाऊ नये अशी सूचना महापालिकेकडून देण्यात आली आहे. या संदर्भातलं एक नोटिफिकेशन मुंबई महापालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आलं आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्निशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी