मुसळधार पावसाचा फटका, 'या' भागातल्या शाळांना सुट्टी; परीक्षा ही रद्द, जाणून घ्या सविस्तर अपडेट्स

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 14, 2022 | 07:55 IST

Rain Updates: मुंबईतही सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत. पुढच्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

School Closed
या भागातल्या शाळांना सुट्टी जाहीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातलं आहे.
  • राज्यातल्या अनेक भागातलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे.
  • मुंबईत (Mumbai) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर पालघर जिल्ह्यासाठी (Palghar District) रेड अलर्ट जारी (Red Alert) केला आहे.

मुंबईः  गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातलं आहे. राज्यातल्या अनेक भागातलं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालं आहे. कोकणातील (Konkan) सर्व जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं (Meteorological Department) मुंबईत (Mumbai) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर पालघर जिल्ह्यासाठी (Palghar District) रेड अलर्ट जारी (Red Alert) केला आहे. मुंबईतही सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत. पुढच्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University)  आज होणाऱ्या परीक्षा ही रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबईतील सद्यपरिस्थितीत आपत्तीच्या पूर्वसूचनेनुसार आणि हवामान खात्याच्या अंदाजावरून  तसंच त्या-त्या भागातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घ्यावा. त्यानुसार आपल्या स्थानिक क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्याबाबत सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेनं योग्य ती कार्यवाही करावी अशी सूचना रात्री उशिरा मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून देण्यात आल्या आहेत. 

अधिक वाचा- 10 वर्षांनी लहान प्रियकरासोबत हॉटेलमध्ये गेली, सकाळ होताच बेडवर आढळला मृतदेह

यासंदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे की,  आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असं उपसंचालक संदीप संगवे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द 

सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठानं आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. आज मुख्यतः इंजिनिअरिंग विद्या शाखेच्या परीक्षा होत्या. त्याचबरोबर इतरही विद्या शाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी दिली आहे.

Mumbai school

ठाण्यात दोन दिवस शाळांना सुट्टी

ठाण्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. ठाण्यातल्या काही भागांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शाळांना पुढील 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Thane School

आपात्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांकडून परिपत्रक काढण्यात आलं आहे. ठाण्यामध्ये गेल्या आठवभऱ्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याला यलो अलर्ट दिल्यामुळे दोन दिवश शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मुंबईतील स्थानिक परिस्थिती पाहून आज सुट्टी देण्याबाबत सक्षम प्राधिकरण यांनी निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आले होते.

 

ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शाळा उद्या आणि परवा म्हणजेच 14 आणि 15 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि अतिवृष्टिमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी ठाणे जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. 

कोणत्या भागात कधीपर्यंत शाळा बंद 

14 जुलै-  पालघर, नांदेड, हिंगोली
14 आणि 15 जुलै- ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली
14, 15 आणि 16 जुलै- पुणे, गडचिरोली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी