Maharashtra Weather Forecast updates: राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. होळीच्या दिवशी राज्यातील अनेक भागांत पाऊस बरसल्यानंतर आता धूलिवंदनाच्या दिवशीही अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासांत राज्यातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यावर तीव्रतेचे ढग असून. नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम विदर्भाचा काही भाग, तसेच मराठवाड्यातही मध्यम ते तीव्र ढग आहेत. पुढील तीन ते चार तासांत या भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Mod intensity clouds over Mumbai Thane, Palghar, — K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 7, 2023
Mod to intense clouds over Nashik Ahmednagar, Ch Sambhaji Nagar, Beed, Dhule, NAndurbar, Jalgao & parts of west Vidarbha,adj Marthwada too.
Possibility of mod to intense thunderstorms in these regions in next 3, 4 hrs.
watch pl pic.twitter.com/Tc0AdRRgdb
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत अंशत: ढगाळ आकाश आणि हलका पाऊस / मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 50-60 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : Rang Panchami: रंगांची एलर्जी असल्यास काय करावे?
नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा : स्वप्नात फळे दिसणे शुभ की अशुभ?
रविवारी रात्रीपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात पावसासोबतच गारपीट सुद्धा झाली. या अवकाळी पावसामुळे कांदा, हरभरा, गहू तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्याच्या सुरुवातीला रब्बी हंगामातील पिके काढण्यात येतात मात्र, त्याचवेळी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.