पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोग्य (Health), गृहनिर्माण (housing)परिक्षांचे पेपर फुटल्याच्या घटना समोर आले आता सत्र सुरूच आहे. शिक्षण विभागाच्या (Education department) शिक्षक भरती (Teacher recuirment) प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी (TET) परिक्षेच्या पेपरातही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी हा कारवाई केली आहे. (Major action by Pune Police in TET Paper leak case, Commissioner of Maharashtra State Examination Council arrested)
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या आरोग्य भरतीचा पेपर फुटला होता. त्यानंतर गृहनिर्माण विभागाच्या म्हाडा परीक्षेचा पेपर (MHADA Exam) फोडण्याचा प्रयत्न झाला आणि आता शिक्षण विभागाच्या शिक्षक भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी (TET) परिक्षेच्या पेपरातही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
पुणे सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशिरा त्यांनी अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा आरोप तुकाराम सुपे यांच्यावर आहे. प्रितेश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते आणि धक्कादायक बाब म्हणजे 2021 च्या टीईटी परीक्षेत यातील बरेच विद्यार्थी पात्र असल्याच यादीवरून लक्षात आलं होतं ,तपासात हे अपात्र उमेदवार पात्र करण्यासाठी तुकाराम सुपे यांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालं आहे.
TET पेपरफुटीप्रकरणी तुकाराम सुपेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकरला अटक करण्यात आलं आहे. तुकाराम सुपेला आज कोर्टात हजर करणार आहेत. तुकाराम सुपे महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. या प्रकरणात अनेक मोठे अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.