मलकापूरजवळ भीषण अपघात, ट्रकची व्हॅनला धडक १३ जणांचा जागीच मृत्यू

गावगाडा
Updated May 20, 2019 | 23:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Accident: मलकापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि व्हॅनच्या धडकेत १३ जणांना चिरडले आहे. यात सात महिला, पाच पुरूष दोन मुलांचा समावेश आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू.

Representational Image
मलकापूरजवळ ट्रकची व्हॅनला धडक १३ जणांचा जागीच मृत्यू  |  फोटो सौजन्य: Getty Images

मलकापूरः  राष्ट्रीय महामार्ग ६ वर भीषण अपघात झाला आहे. मलकापूर येथून येणारी महिंद्रा मॅक्झीमो गाडी आणि टाटा मॅक्स ट्रक यांची एकमेकांना धडक बसली. या धडकेत १३ जण ठार झाले आहेत तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटना आज दुपारी अडीच वाजता घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग ०६ वर धरणगाव जवळ असलेल्या रसोया कंपनी समोर मुंबईकडून नागपूरच्या दिशेनं जात असलेला ट्रक ( MH 40 BG 9112) आणि मलकापुरहून अनुराबादच्या दिशेनं जाणारा टाटा मॅक्स (  MH 46 X 7925 ) या एकमेकांना धडक बसली. त्यानंतर टाटा मॅक्समध्ये बसलेल्या १६ जणांपैकी १३ जण ठार झाले आहे. यावेळी ट्रकचे टायर फुटल्यानं चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावं खालीलप्रमाणे 

 1. अनिल मुकुंद ढगे
 2. छाया गजानन खडसे
 3. अशोक लहू फिरके
 4. नथ्थू वामन चौधरी
 5. आरती
 6. रेखा
 7. सोयीबाई छगन शिवरकर
 8. विरेन ब्रिजलाल मिळवतकर
 9. सतीश छगन शिवरकर
 10. मीनाबाई बिलोरकर
 11. किसन सुखदेव बोराडे
 12. प्रकाश भारंबे
 13. मेघा प्रकाश भारंबे 

जखमी झालेल्यांची नावे 

 1. गोकुळ भालचंद्र भिलवसकर
 2. छगन राजू शिवरकर
 3. रोहित नथ्थू चौधरी 

नागरिकांच्या सहकार्यानं ट्रक खाली दबलेल्या व्हॅनमधील तिघा जणांना क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर दोन्ही दिशेनं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर काहीवेळानं शहर आणि ग्रामीण पोलिसांनी हायवे पोलिसांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
मलकापूरजवळ भीषण अपघात, ट्रकची व्हॅनला धडक १३ जणांचा जागीच मृत्यू Description: Accident: मलकापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि व्हॅनच्या धडकेत १३ जणांना चिरडले आहे. यात सात महिला, पाच पुरूष दोन मुलांचा समावेश आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
 साताऱ्यात भाजप आणि राजेंना धक्का देण्याचा पवारांचा 'गेम' प्लान, राष्ट्रवादीत होणार इनकमिंग 
साताऱ्यात भाजप आणि राजेंना धक्का देण्याचा पवारांचा 'गेम' प्लान, राष्ट्रवादीत होणार इनकमिंग 
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ सप्टेंबर २०१९: 'गेम प्लॅन' ते हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १९ सप्टेंबर २०१९: 'गेम प्लॅन' ते हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
[VIDEO]: मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी, नागरिकांमध्ये घबराट
[VIDEO]: मुंबईत गॅस गळतीच्या तक्रारी, नागरिकांमध्ये घबराट
मनसेचे ठरलंय,  इतक्या जागांवर लढविणार विधानसभा निवडणूक?
मनसेचे ठरलंय,  इतक्या जागांवर लढविणार विधानसभा निवडणूक?
[VIDEO]: मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी
[VIDEO]: मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी
अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची पुन्हा मेगाभरती, युतीवरही होणार अंतिम निर्णय
अमित शहांच्या उपस्थितीत भाजपची पुन्हा मेगाभरती, युतीवरही होणार अंतिम निर्णय
मुरबाडमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू
मुरबाडमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू
तयार रहा, आज दुपारी 12 वाजता होणार निवडणुकांची घोषणा
तयार रहा, आज दुपारी 12 वाजता होणार निवडणुकांची घोषणा